31.8 C
Latur
Tuesday, May 11, 2021
Homeपरभणीमहाराष्ट्राने संपूर्ण देशाला लोकशाही दाखविली

महाराष्ट्राने संपूर्ण देशाला लोकशाही दाखविली

एकमत ऑनलाईन

परभणी : महाराष्ट्रात २०१९च्या विधानसभा निवडणूक निकालानंतर राज्याने संपूर्ण देशाला लोकशाही काय असते हे दाखवून दिले. ६४ आमदार असणारा मुख्यमंत्री, ५४ आमदार असणारा उपमुख्यमंत्री तर ४४ आमदार असणा-यास मंत्रीपदे तर १०५ आमदार असणा-या पक्षाला लोकशाहीमुळे विरोधी बाकावर बसण्याची वेळ आली असा टोला सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांनी लगावला.

श्री शिवाजी महाविद्यालयात पदवीधर मतदारसंघातील महाविकास आघाडीचे उमेदवार सतीश चव्हाण यांच्या प्रचारार्थ आयोजीत पदवीधर व कार्यकर्ता मेळाव्यात ते बोलत होते. यावेळी व्यासपिठावर खा.संजय जाधव, खा.फौजिया खान, आ.सुरेश वरपूडकर, आ.बाबाजानी दुरार्णी, खा.जयसिंगराव गायकवाड, आ.विक्रम काळे, आ.अमोल मिटकरी, महापौर अनिता सोनकांबळे, माजी माजी खा.तुकाराम रेंगे पाटील, माजी खा.सुरेश जाधव, माजी आ.डॉ.मधूसूदन केंद्रे, माजी आ.विजय भांबळे, माजी महापौर प्रताप देशमुख, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख विशाल कदम, सभापती अनिल नखाते, महिला जिल्हाध्यक्षा भावनाताई नखाते, बाळासाहेब जामकर, राष्ट्रवादीचे प्रा.किरण सोनटक्के, काँग्रेसचे नदीम इनामदार आदीची उपस्थिती होती.

पुढे बोलतांना मुंडे म्हणाले की, २०१९ च्या निवडणुकीनंतर महाविकास आघाडी सरकार स्थापण झाले. जनतेच्या कल्याणासाठी तीन पक्षांनी एकत्र येत नवीन समिकरणे मांडली. या सरकारने लोकहिताचे निर्णय घेतले असून यापुढे महाविकास आघाडी सरकार समोर भाजपा कधीही टिकणार नसल्याचे ते म्हणाले. 2014 च्या मोदी लाटेत पदवीधर निवडणुकीत सतीश चव्हाण विजयी झाले. राज्यात सत्ता असो किंवा नसो पदवीधर, बेरोजगाराचे प्रश्‍न, मराठवाड्याच्या हक्काच्या पाण्याचा प्रश्‍न, वैद्यकीय प्रवेशासाठीचा 70:30 चा फॉम्युर्ला रद्द करण्याची बाब असो सतीश चव्हाण यांनी विधान परिषदेमध्ये आक्रमकतेने प्रश्‍न मांडली. महाविकास आघाडी सरकार चांगला पध्दतीने काम करीत आहे. आगामी काळातही विकासा विषयीचे अनेक निर्णय घेतल्या जातील. महाराष्ट्राच्या जनतेची सेवा करावयाची आहे, असे मुंडे म्हणाले.

यावेळी आ.काळे म्हणाले की, पदवीधरांच्या न्यायहक्कासाठी सतिश चव्हाण यांनी सभागृहात प्रश्‍न मांडून त्याचा पाठपुरावा देखील केला आहे. यंदाचा निवडणुकीत शिवसेनेची साथ असून चव्हाण यांना तिस-यांदा विजयी करा, असे आवाहन त्यांनी केले. विरोधकांचा सोशल मिडिया पुढे असून महाविकास आघाडीची बदनामी केल्या जात असल्याचा आरोप यावेळी अमोल मिटकरी यांनी केला. सतीश चव्हाण यांना विजयी करण्यासाठी पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी नियोजनबध्द पध्दतीने काम करावे असे माजी खा.जयसिंगराव गायकवाड म्हणाले. यावेळी शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

चार दुकानांना भिषण आग : लाखोंचे नुकसान

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,494FansLike
186FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या