25 C
Latur
Monday, May 17, 2021
Homeपरभणीनैसर्गीक संकटात महाविकास आघाडी शेतक-यांच्या पाठीशी

नैसर्गीक संकटात महाविकास आघाडी शेतक-यांच्या पाठीशी

कृषि राज्यमंत्री डॉ.विश्वजीत कदम यांची ग्वाही

एकमत ऑनलाईन

परभणी : राज्यात अवकाळी व परतीच्या पावसाने शेतक-यांचे मोठ्या प़्रमाणात नुकसा झाले आहेत. नुकसानग्रस्त भागातील शेतीचे पंचनामे करण्यात आले असून शेतक-यांना १० हजार रुपयाचे पॅकेज शासनाने जाहीर केले आहे.नैसर्गीक संकटात महाविकास आघाडीचे शासन निश्चीतच शेतक-यांच्या पाठीशी असल्याची ग्वाही कृषिराज्यमंत्री डॉ. कदम यांनी दिली.

जिल्हयात नुकसान झालेल्या शेतीची पाह़णी करण्यासाठी ते परभणीत आले होते यावेळी त्यांनी विविध खात्याचा आढावा घेत पावसामुळे झालेल्या शेतीच्या नुकसानीचाही आढावा घेतला. गेल्या सात महिन्यापासून राज्य शासन कोरोनाचा सामना करीत आहे. अशाही परिस्थितीत अवकाळी व परतीच्या पावसाने नुकसान झालेल्या शतेक-यांना १० हजाराचे पॅकेज जाहीर केले. यात शेतीचे नुकसान , रस्ते व जमीनीची दुरुस्ती यासाठी मदत जाहीर केली आहे.

परभणी जिल्हयात झालेल्या नुकसानीचे पंचनामे झाले असून जिल्हयात १ लाख ७९ हजार हेक्टरचे नुकसान झाले असून त्यासाठी १२२ कोटी रुपयाची मागणीचा अहवाल शासनाकडे पाठवला आहे. येत्या एक महिन्यात शेतक-याच्या खात्यावर ही रक्कम आदा केली जाईल. तसेच महात्मा फुले शेतकरी कर्जमुक्ती अभियानही जिल्हयात यशस्वीपणे राबविण्यात आले आहे. शेतक-यांना तातडीची मदत करणे गरजेचे असल्याने सर्व बॅकांना तात्काळ पीककर्ज प्रकरणे निकाली काढण्याचे निर्देश दिले असल्याचे त्यांनी सांगीतले.यावेळी जिल्हाधिकारी दिपक मुगळीकर, पोलीस अधिक्षक जयंत मिना, आ.सुरेश वरपूडकर, जिल्हा उपनिबंधक मंगेश सुरवसे, निवासी उपजिल्हाधिकारी महेश वडदकर आदी उपस्थित होते.

जिल्हापरिषदेच्या ४ सदस्यांचे सदस्यत्व धोक्यात?

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,496FansLike
190FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या