26.4 C
Latur
Wednesday, October 5, 2022
Homeपरभणीरुग्णालयाचा गलथान कारभार सुधारावा अन्यथा आंदोलन

रुग्णालयाचा गलथान कारभार सुधारावा अन्यथा आंदोलन

एकमत ऑनलाईन

परभणी : जिल्हा सामान्य रुग्णालय असुविधेच्या विळख्यात सापडले आहे या रुग्णालयात गैर व्यवस्थापनात दिवसेंदिवस वाढ होत आहे. या संपुर्ण प्रकाराची सखोल चौकशी करण्यात यावी कोरोना सारख्या महामारी संदर्भात जिल्हा रुग्णालय गंभीर नाही ही बाब समोर आली आहे. त्यामुळे आवश्यक उपाययोजना त्वरीत करम्यात याव्यात या मागणीचे निवेदन जिल्हाधिका-यामार्फत इन्साफ युथ फाउंडेशनच्या वतीने मुख्यमंत्र्याकडे निवेदन देण्यात आले आहे.

या निवेदनात जिल्हा सामान्य रुग्णालयात कोरोना रुग्णांसाठी आवश्यक असणारी आॅक्सीजन यंत्रणा कार्यान्वीत नाही. तसेच अनेक समस्यांना रुग्णांना सामोरे जावे लागत आहे. नागरिकांना योग्य सल्ला देण्यात येत नाही. नागरिकांची हेळसांड होत आहे. कोरोना मुक्त ऐवजी दुस-याच महिलेला सुटी देण्यात आली असे प्रकार घडत आहेत. जिल्हा सामान्य रुग्णालयात कोरोना रुग्णांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत असून आज घडीला शेकडो रुग्ण आहेत. तरीही आरोग्य विभाग झोपेतच असल्याचे दिसून येत आहे. कोरोना कक्षात रु ग्णासाठी आॅक्सीजन पुरवठा तात्काळ करण्यात यावा.

गत चार दिवसापुर्वी आॅक्सीजन न मिळाल्याच्या कारणावरून रुग्णांचा मृत्यू झाल्याचा व्हिडीओ वायरल झाला त्याचीही दखलघेणे गरजेचे आहे. कोरोना माहामारीमुळे अनेकांना आपला जीव गमवावा लागला तर कित्येक नागरिक कोरोना आजाराशी लढा देत आहेत.जिल्हा रुग्णालयाच्या कर्मचारी व आरोग्य अधिका-यांनी हा प्रकार गांभीर्याने घेत नागरिकांना आरोग्य सुविधा उपलब्ध करून देण्यात याव्यात.

जिल्हाधिका-यांना रुग्णालयाच्या कारभाराच्या चौकशीसाठी समिती गठीत करण्यात यावी.कोवी्ड विभागाचा गलथान कारभार चव्हाट्यावर येत आहे. कोरोना रुग्णांना त्तात्काळ आरोग्य सुविधा पुरविण्यात याव्यात कामात दिरंगाई करणा-या अधिकारी व कर्मचा-यांवर कार्यवाही करण्यात यावी.अन्यथा येत्या ५ आॅगस्ट रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर थाळ्या वाजवून निषेध आंदोलन करण्याचा इशारा इंसाफ फाउंडेशनच्या वतीने दिलेल्या निवेदनात नमुद आहे. या निवेदनावर सय्यद अझहर, सचिन देशपांडे, शेख नदीम,पवन क टकुरी आदींच्या स्वाक्ष-या आहेत.

Read More  वसमत शहरातील कंटेटमेंट भागामध्ये रॅपिड अँटीजन तपासणी मोहिम

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या