28.1 C
Latur
Sunday, October 2, 2022
Homeपरभणीकोरोना काळात आरोग्य कर्मचा-यांची अनेक पदे रिक्त

कोरोना काळात आरोग्य कर्मचा-यांची अनेक पदे रिक्त

एकमत ऑनलाईन

जिंतूर : तालूक्यातील आसेगाव येथील प्रा.आ.केंद्रातील विविध रिक्त पदामुळे आरोग्य केंद्राची अवस्था कोरोना महामारीत सलाईनवर असलेल्यांचे दिसत आहे. या परिसरातील 30 हजार नागरिकांच्या आरोग्याची जबाबदारी या आरोग्य केंद्रावर आहे. वस्सा, बोर्डी, कसर, रोहिला पिंपरी, दुधगाव ही पाच आरोग्य उपकेंद्र आसेगाव प्रा.आ.च्या अंतर्गत येतात. परंतु विविध रिक्त पदामुळे आरोग्य सेवेवर याचा विपरीत परिणाम होत आहे.

आसेगाव प्रा.आ.केंद्रात गत 5 – 6 वर्षांपासून प्रयोग शाळा तंत्रज्ञाचे पद रिक्त आहे. ज्या मुळे मलेरिया तपासणी मध्ये अडचणी येत आहेत. तसेचं आरोग्य सहाय्यिकेचे पद 2 वर्षांपासून रिक्त आहे. उपकेंद्र वस्सा व प्रा.आ.केंद्र आसेगाव येथिल परिचारिकेचे पद रिक्त आहे. तसेचं उपकेंद्र दुधगाव व प्रा.आ.केंद्र आसेगाव येथिल आरोग्य सेवकाचे पद रिक्त आहे. प्रा. आ.केंद्र आसेगाव येथिल परिचराच्या मान्य 4 पदा पैकी फक्त एकचं पद भरलेले आहे.

या सर्व रिक्त पदामुळे रुग्णांना दर्जेदार आरोग्य सेवा मिळणे अवघड झाले आहे. रिक्त पदामुळे लसीकरण, गरोदर मातांची आरोग्य तपासणी, कुटुंब कल्याण शस्त्रक्रिया कार्यक्रम, मलेरिया, साथरोग नियंत्रण आदिवर प्रतिकूल परिणाम होत आहे ज्या कडे आरोग्य विभागाचे पूर्णत: दुर्लक्ष होत आहे. सध्याच्या कोविड 19 च्या प्रादुर्भावाच्या काळात ग्रामीण भागातील प्रा.आ.केंद्र सक्षम असणे आवश्यक आहे.

हे लक्षात घेऊन आरोग्य विभागाने आसेगाव प्रा.आ.केंद्रातील व अंतर्गत उपकेंद्रातील रिक्त पदे आहे ती त्यांनी वेळेवर भरली नाही तर दुसरीकडे सर्व लोकप्रतिनिधी मंडळी निवडणूकीतच दर्शन देत असल्याने या नेते मंडळीवर ग्रामस्थ संतापलेले दिसत आहे.सध्या जमावबंदी आदेश असल्याने आम्ही शांत आहो जर हि पदे त्वरित नाही भरली तर लोकशाही मार्गाने रस्त्यावर उतरावे लागेल अशी संतप्त प्रतिक्रिया या परिसरातील त्रस्त ग्रामस्थांनी केली आहे.

Read More  आरोग्य विभागातील प्रत्येक कर्मचा-यांची बदली करा : जिल्हाधिकारी

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या