19.6 C
Latur
Tuesday, February 7, 2023
Homeपरभणीशेतक-यांचा महावितरण विरोधात तहसीलवर मोर्चा

शेतक-यांचा महावितरण विरोधात तहसीलवर मोर्चा

एकमत ऑनलाईन

पूर्णा : शेतक-यांच्या हक्कासाठी व महावितरण कंपनीकडून होत असलेल्या त्रासाच्या विरोधात शेतक-यांच्या वतीने बुधवार, दि़ २८ डिसेंबर रोजी तहसील कार्यालयावर धडक मोर्चा काढण्यात आला़ या मोर्चाला विविध पक्ष संघटनानी पाठिंबा दिला होता.

पूर्णा तालुक्यातील शेतक-यांवर विद्युत महावितरण कंपनीकडून होत असलेल्या अन्यायाच्या विरोधात बुधवारी सकाळी १०़३० वाजता तालुक्यातील शेतकरी बांधवांनी टी पॉइंटवर ते तहसील कार्यलयावर धडक मोर्चा काढला. थ्री फेज आणि सिंगल फेज वेगवेगळे करण्यात यावे़ ग्रामीण भागातील भारनियम बंद करण्यात यावे़ शेतपंपाची सक्तीची वसुली बंद करावी़ शेतक-यांवरील दाखल केलेले खोटे गुन्हे वापस घेण्यात यावे़ महावितरण कंपनीने शेतक-यांच्या केलेल्या नुकसानाची भरपाईचा मोबदला त्वरित देण्यात यावा.

अभियंता वसमतकर यांनी शेतक-यांना त्रास देऊन मालमत्ताचे नुकसान केले आहे़ त्यामुळे त्यांच्यावर आणि त्यांच्या सहका-यांवर गुन्हा दाखल करून शेतक-यांना न्याय देण्यात यावे अशा विविध मागणीचे निवेदन नायब तहसीलदार नितेशकुमार बोलुले यांना देण्यात आले़ या मोर्चामध्ये राष्ट्रवादी कॉग्रेसने पाठींबा देऊन शहर अध्यक्ष प्रताप कदम यांच्या नेतृत्वाखाली शेकडो कार्यकर्ते सहभागी झाले होते. या निवेदनावर शिवराम बुचाले, कैलास बुचाले, शाम बुचाले, पवन पवार, गोविंद पवार, सुभाष पवार, शेषराव बुचाले यांच्यासह असंख्य शेतक-यांच्या स्वाक्ष-या आहेत.

Stay Connected

1,567FansLike
186FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या