23.1 C
Latur
Monday, August 2, 2021
Homeपरभणीकोरोनाने अनाथ झालेल्या मुलींच्या लग्नासाठी मंगल कार्यालय विनामुल्य मिळणार

कोरोनाने अनाथ झालेल्या मुलींच्या लग्नासाठी मंगल कार्यालय विनामुल्य मिळणार

एकमत ऑनलाईन

परभणी : कोरोना विषाणूच्या प्रादुभार्वाने पालक गमावलेल्या अनाथ मुलींच्या विवाह सोहळ्यासाठी जिल्हा मंगल कार्यालय संघटनेने जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर यांनी केलेल्या आवाहनाप्रमाणे विनामूल्य मंगल कार्यालय उपलब्ध करून देण्याचा निर्णय जाहीर केला आहे. गेल्या सव्वा वषार्पासून कोरोनाच्या आपत्तीत शहरासह जिल्ह्यातील सर्व मंगल कार्यालय व मंडप डेकोरेनशन चालक आर्थिकदृष्ट्या अक्षरश: अडचणीत सापडले आहेत. अशा या आपत्तीतसुध्दा सामाजिक बांधिलकीपोटी मंगल कार्यालय संघटनेने जिल्हाधिकारी मुगळीकर यांनी केलेल्या आवाहनास तातडीने प्रतिसाद दिला.

या वर्षी कोरोनाच्या आपत्तीने पालकत्व गमावलेल्या अनाथ मुलींच्या लग्न सोहळ्यासाठी मंगल कार्यालय विनामूल्य उपलब्ध करण्याचा निर्णय घेतला. विशेष म्हणजे मंडप डेकोरेशन असोसिएशननेसुध्दा संघटनेच्या या निर्णयास समर्थन जाहीर करीत मंडप डेकोरेशनचे सर्व साहित्य विनामूल्य द्यावयाचा निर्णय घेतला आहे.दरम्यान, जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर यांना मंगल कार्यालय संघटनेने आवाहनाप्रमाणे घेतलेल्या त्या निर्णयाची माहिती दिली. त्याचबरोबर मंगल कार्यालयांमधून लग्न कार्यांकरीता सर्वांच्या सोयीसाठी व-हाडींच्या संख्येत वाढ करुन नियमांच्या अधीन राहून परवानगी द्यावी, अशी अपेक्षा व्यक्त केली.

यावेळी संघटनेचे अध्यक्ष प्रमोद वाकोडकर, प्रभाकरराव देशमुख, जयंत देशमुख, सचिव शंकर आजेगांवकर, मिलींद डुब्बेवार, सखाराम दुधाटे, महेश सराफ, सय्यद गफार, गोविंद अग्रवाल, अविनाश कुलकर्णी, राजू चौधरी, गणेश सरदेशपांडे, डॉ.संजय टाकळकर, अभिजित सराफ, जे.एस. शेख, प्रतिम चक्रवार, गौतम डहाळे, आनंद मकरंद, रघुनाथ आढाव, प्रशांत गुंड, त्रिपाठी, तिवारी आदी उपस्थित होते.जिल्हा मंगल कार्यालय संघटनेच्या या निर्णयाचे नागरिकातून स्वागत करण्यात येत आहे.

महिलेने एकाच वेळी दिला १० बाळांना जन्म

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,527FansLike
200FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या