25.7 C
Latur
Thursday, March 23, 2023
Homeपरभणीसामूहिक विवाह सोहळे काळाची गरज : आमदार लोणीकर

सामूहिक विवाह सोहळे काळाची गरज : आमदार लोणीकर

एकमत ऑनलाईन

परभणी : मुलींचे विवाह करण्यासाठी गरीब पालकांचे घर, शेती जाते. अनेक पालक लग्नाच्या खर्चामुळे कर्जबाजारी होतात. हे थांबण्यासाठी सामुहीक विवाह सोहळ्यांचे आयोजन झाले पाहिजे. सामुहीक विवाह सोहळ्यातून गरीब, श्रीमंत अशा सर्वच घटकातील मुला-मुलींचे विवाह करणे काळाची गरज असल्याचे प्रतिपादन माजी मंत्री आमदार बबनराव लोणीकर यांनी केले.

येथील अक्षदा मंगल कार्यालयात रविवार, दि. ५ मार्च रोजी आमदार बबनराव लोणीकर यांच्या वाढदिवसानिमित्त सोनार समाजाचा राज्यस्तरीय वधू-वर परीचय मेळावा व सामुहीक विवाह सोहळ्याचे उद्घाटन माजी मंत्री आमदार लोणीकर यांच्याहस्ते करण्यात आले. कार्यक्रमाचे अध्यक्ष माजी खासदार अ‍ॅड.सुरेशराव जाधव होते. यावेळी हभप.मौनी उर्फ अंबादास दहीवळ महाराज, भाजपा महानगराध्यक्ष आनंद भरोसे, डॉ.प्रफुल्ल पाटील, गोविंद अजमेरा, धनराज विसपुते, सुधाकरराव धानोरकर, अनिलसेठ वाघाळकर, कृष्णा आष्टीकर, नितीन आष्टीकर, बालाजीराव उदावंत, सुवर्णाताई लोलगे, अशोकराव कुलथे, सुरज लोलगे, कैलास भांबुर्डेकर, जे.बी. सराफ, मोहन हिवरकर, दिलीप शहाणे, अजय डहाळे, माधवराव दहीवाळ, मधुकरराव मैड, भास्करराव टेहरे, अशोकराव डहाळे, सचिन अंबिलवादे, दिनेश डहाळे, सुरेश टाक, प्रभाकर कुलथे, भगवानराव शहाणे, प्रकाश माथने, प्रभाकरराव मोरे उपस्थित होते. यावेळी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते श्री संत नरहरी महाराज यांच्या प्रतिमेचे पुजन व दिपप्रज्वलन करून या सोहळ्याचे उद्घाटन करण्यात आले.

पुढे बोलताना आमदार लोणीकर म्हणाले की, सोनार समाजातही अनेक लोक गरीब आहेत. त्यांच्यासाठी चंद्रकांत डहाळे यांच्यासारखे समाज रत्न समाजसेवेत कार्यरत रहायला हवेत. विवाह सोहळ्याच्या आयोजनाबद्दल आयोजकांचे आभार माणून वधू-वर परीचय मेळावा व विवाह सोहळ्यांसाठी आमदार लोणीकर यांनी शुभेच्छा दिल्या.

यावेळी प्रास्ताविकात आयोजक चंद्रकांत डहाळे म्हणाले की, सोनार समाजाचे अनेक प्रश्न असून या प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून प्रयत्नशील आहे. त्यासाठीच समाजाचे राज्यस्तरीश अधिवेशन घेण्याचा मानस आहे. वधू-वर परीचय मेळावा हा केवळ गरीबांसाठी असतो ही मानसिकता बदलायला हवी असे डहाळे यांनी सांगितले. वधू-वर परीचय मेळावा व सामुहीक विवाह सोहळ्यासाठी सोनार समाज बांधव हजारोंच्या संख्येने उपस्थित होते.

Stay Connected

1,567FansLike
183FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या