26.1 C
Latur
Friday, July 1, 2022
Homeपरभणीघरकुलासाठी पंचायत समिती स्तरावर लाभार्थ्यांचा मेळावा

घरकुलासाठी पंचायत समिती स्तरावर लाभार्थ्यांचा मेळावा

एकमत ऑनलाईन

परभणी : ग्रामीण भागातील गरजू आणि पात्र लाभार्थ्यांना प्रधानमंत्री आवास योजने अंतर्गत घरकुल योजनेचा विनाविलंब लाभ मिळावा म्हणून जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी शिवानंद टाकसाळे यांच्या संकल्पनेमधून प्रपत्र ड आवास प्लस प्राधान्यक्रम यादीतील लाभार्थ्यांना प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण २०२१-२२ अंतर्गत घरकुलाची मंजुरी देण्यासाठी दि. २ जून २०२२ रोजी प्रत्येक पंचायत समिती स्तरावर मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे.

तालुका स्तरावर होणा-या या मेळाव्यामध्ये लाभार्थ्यांकडून ऑनलाईन रजिस्ट्रेशन करण्यासाठी बँक पासबुक, आधार कार्ड, मोबाईल क्रमांक इत्यादी आवश्यक ती कागदपत्रे जमा करण्यात येणार आहेत. प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण अंतर्गत २०२१-२२ मधील जास्तीत जास्त लाभार्थ्यांनी आपली कागदपत्रे सदर मेळाव्यात जमा करण्याचे आवाहन जि.प.चे मुख्य कार्यकारी अधिकारी शिवानंद टाकसाळे, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्या प्रकल्प संचालक रश्मी खांडेकर यांनी केले आहे.

Stay Connected

1,567FansLike
187FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या