21.9 C
Latur
Monday, August 8, 2022
Homeपरभणीपालम येथे विरोधी पक्षनेते अजित पवार, धनंजय मुंडे यांची भेट

पालम येथे विरोधी पक्षनेते अजित पवार, धनंजय मुंडे यांची भेट

एकमत ऑनलाईन

परभणी : अतिवृष्टी झालेल्या जिल्ह्यातील जनतेशी संवाद साधण्यासाठी व ओला दुष्काळ जाहीर करावा या मागण्यांसाठी आयोजित संवाद दौ-या दरम्यान विरोधी पक्षनेते अजित पवार व आ. धनंजय मुंडे यांनी रविवार, दि.३१ जुलै रोजी सकाळी पालम येथे धावती भेट दिली. यावेळी त्यांनी राष्ट्रवादीच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांशी चर्चा केली.

पालम येथून जात असताना शहरातील मुख्य चौकात थोडा वेळ थांबून विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी राष्ट्रवादीच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांशी चर्चा केली. याप्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे तालुकाध्यक्ष तथा नवनिर्वाचित नगराध्यक्ष वसंतराव सिरस्कर ‌यांनी शेतक-यांच्यावतीने निवेदन दिले. पालम शहरातील विकास कामासह विविध विषयांवर चर्चा केली.

यावेळी तालुकाध्यक्ष तथा नगरध्यक्ष वसंतराव सिरस्कर, शहराध्यक्ष तथा उपनगराध्यक्ष इमदादखा पठाण, नगरसेवक तथा स्वच्छता व आरोग्य सभापती ज्ञानराज घोरपडे, बांधकाम सभापती प्रभाकर सिरस्कर, नगरसेवक संजय थिट्टे, नगरसेवक सय्यद ईखारभाई , नगरसेवक जालिंदर हत्तीअंबीरे, नगरसेवक सुगंध हिवरे, दत्तराव घोरपडे, शेख मकदुम भाई, रईस कुरेशी, चंद्रकांत रोकडे, सगीर सरवरी, दिलीपराव रोकडे, आय्या, चाऊस यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या