18.1 C
Latur
Friday, December 2, 2022
Homeपरभणीमुख्यमंत्री ग्राम सडक योजनेच्या सदस्यपदी आमदार डॉ. गुट्टे यांची निवड

मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेच्या सदस्यपदी आमदार डॉ. गुट्टे यांची निवड

एकमत ऑनलाईन

गंगाखेड : गंगाखेड विधानसभा मतदार संघाचे आमदार डॉ. रत्नाकर गुट्टे यांची परभणी जिल्हास्तरीय मुख्यमंत्री ग्राम सडक योजना अंमलबजावणी समितीचे सदस्य म्हणून निवड करण्यात आली आहे. याबाबतचे पत्र पालकमंत्री तानाजी सावंत यांनी आ.डॉ. गुट्टे यांना नुकतेच दिले आहे.

मुख्यमंत्री ग्रामसडक योजना टप्पा-२ अंतर्गत रस्त्यांची निवड करण्यासाठी ग्रामविकास विभागाच्या शासन निर्णयानुसार पालकमंत्री यांच्या निर्देशाप्रमाणे आमदार डॉ.गुट्टे यांची या समितीच्या सदस्यपदी नियुक्ती करण्यात आली आहे. आ.डॉ.गुट्टे हे सातत्याने जनतेच्या हिताकडे लक्ष देऊन काम करत आहेत. त्यामुळे मतदार संघातले वषार्नुवर्षे प्रलंबित असणारे अनेक प्रश्न मार्गी लागत आहेत. विविध विभागाशी भेटून जास्तीत-जास्त निधी मिळविण्यात देखील त्यांनी यश मिळवले आहेÞ रस्ते विकास आणि अंमलबजावणी या विधायक कामासाठी पालकमंत्री तानाजी सावंत यांनी दाखविलेला विश्वास सार्थ करून दाखवणार असल्याचा मनोदय आमदार डॉ.गुट्टे यांनी व्यक्त केला आहे. दरम्यान, आमदार डॉ.गुट्टे यांच्या निवडीमुळे आ.डॉ.रत्नाकर गुट्टे काका मित्रमंडळ व राष्ट्रीय समाज पक्षाचे पदधिकारी व कार्यकर्ते यांच्यासह मतदार संघातील व्यापारी, शिक्षक, कर्मचारी यांनी पेढे वाटून आनंद साजरा केला आहे.

Stay Connected

1,567FansLike
187FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या