34.3 C
Latur
Tuesday, April 20, 2021
Homeपरभणीपरभणी बँकेच्या अध्यक्षपदी आमदार वरपुडकर, उपाध्यक्षपदी राजेश पाटील गोरेगावकर

परभणी बँकेच्या अध्यक्षपदी आमदार वरपुडकर, उपाध्यक्षपदी राजेश पाटील गोरेगावकर

एकमत ऑनलाईन

परभणी: जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या अध्यक्षपदी माजी मंत्री तथा आ. सुरेश वरपुडकर तर उपाध्यक्षपदी राजेश पाटील गोरेगावकर यांची बिनविरोध निवड झाली आहे. अध्यक्ष – उपाध्यक्षपदाच्या निवडीसाठी मंगळवारी जिल्हा बँक सभागृहात नवनिर्वाचित सदस्यांची विशेष बैठक आयोजित करण्यात आली. सकाळी अकरा वाजता अध्यक्ष – उपाध्यक्ष पदासाठी अर्ज दाखल करावयास सुरवात झाली. त्यावेळी आमदार वरपुडकर व सौ. प्रेरणा वरपुडकर या दोघांनी अध्यक्षपदासाठी उमेदवारी अर्ज दाखल केला.

तर उपाध्यक्षपदासाठी औंढा नागनाथ सहकारी संस्था गटातील नवनिर्वाचित सदस्य गोरेगावकर यांनी अर्ज दाखल केला. अऩ्य कोणाचेही अर्ज आले नाहीत. छानणी प्रक्रियेतून हे अर्ज वैध ठरल्यानंतर सौ. प्रेरणा वरपुडकर यांनी अध्यक्षपदासाठीचा अर्ज मागे घेतला. त्यामुळे अध्यक्षपदी आमदार वरपुडकर यांची बिनविरोध निवड जाहीर करण्यात आली. उपाध्यक्षपदी गोरेगावकर यांच्या बिनविरोध निवडीची घोषणा निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हा उपनिबंधक मंगेश सुरवसे यांनी केली.

प. बंगाल, आसामसह बिहार भूकंपाने हादरले

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,478FansLike
169FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या