24.2 C
Latur
Tuesday, July 5, 2022
Homeपरभणी‘मनसे’ वाहतूक सिग्नलला पुष्पहार अर्पण करून नोंदवणार निषेध

‘मनसे’ वाहतूक सिग्नलला पुष्पहार अर्पण करून नोंदवणार निषेध

एकमत ऑनलाईन

परभणी : परभणी महानगरपालिका हद्दीतील प्रमुख चौक व रस्त्यांवर लाखो रुपये खर्चून गेल्या आठ-दहा वर्षांपूर्वी वाहतूक सिग्नल यंत्रणा कार्यान्वित करण्यात आली. परंतु, आजपर्यंत या सिग्नल यंत्रणेकडे शहर वाहतूक शाखाकिंवा महापालिका प्रशासनाने ढुंकूनही पाहिले नाही. परिणामी वाहतूक सिग्नल यंत्रणा बसवल्यापासून आजपर्यंत धूळखात असून नादुरुस्त झाली आहेÞ याकडे तातडीने लक्ष देवून सिग्नल यंत्रणा कार्यान्वित करावी अन्यथा ट्रॅफिक सिग्नलला पुष्पहार अर्पण करून निषेध नोंदवण्यात येईल असा इशारा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या एका शिष्टमंडळाने प्रशासनास निवेदनाद्वारे दिला आहे

या संदर्भात प्रशासनास दिलेल्या निवेदनात शहरातील वाहतूक सुरळीत करण्यासाठी सिग्नल यंत्रणा कार्यान्वित करणे आवश्यक असल्याचे म्हटले आहेÞ वाहतूक सिग्नल कार्यान्वित झाल्यास शहरात अनेक ठिकाणची वाहतूक कोंडीचा प्रश्न निकाली निघणार आहेÞ त्यामुळे वाहतूक सिग्नल त्वरीत कार्यान्वित करावेत अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहेÞ निवेदनावर अंकुशराव शेटे, शेख शाहेद, अनिल भराडे, वैभव पवार, शेख रफीक यांची नावे आहेत.

Stay Connected

1,567FansLike
187FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या