27.3 C
Latur
Monday, January 30, 2023
Homeपरभणीनिवडणुकीदरम्यान गैरहजर १३ जणांविरुद्ध निलंबनाचा प्रस्ताव

निवडणुकीदरम्यान गैरहजर १३ जणांविरुद्ध निलंबनाचा प्रस्ताव

एकमत ऑनलाईन

परभणी : जिल्ह्यात ११९ ग्रामपंचायतींसाठी घेण्यात आलेल्या सार्वत्रिक निवडणुकीदरम्यान प्रशिक्षण घेतल्यानंतर गैरहजर राहिलेल्या १३ अधिकारी-कर्मचा-यांविरोधात निलंबन किंवा शिस्तभंगाची कार्यवाही करण्याबाबतचा प्रस्ताव जिल्हाधिकारी आंचल गोयल यांच्याकडे पाठविण्यात आला आहे.

ग्रामपंचायत सार्वत्रिक निवडणूक-२०२२ च्या अनुषंगाने मतदान केंद्रावर मतदान केंद्राध्यक्ष व मतदान केंद्राधिकारी म्हणून कर्मचा-यांची नियुक्ती करण्यात आली होती. परंतु काही कर्मचारी दोन वेळा प्रशिक्षण घेऊन शनिवारी(दि. १७) निवडणूक कर्तव्यावर विनापरवानगी गैरहजर राहिल्याने निवडणूक कामात अडथळा निर्माण झाला.

त्यामुळे संबंधीत १३ अधिकारी आणि कर्मचा-यांविरुद्ध राज्य निवडणूक आयोगाच्या आदेश क्रमांक रानिआ-२००६/प्र.कृ.१४/का-५, दि. २ ऑगस्ट २००६ अन्वये निलंबन किंवा शिस्तभंगविषयक कारवाई प्रस्तावित करण्याबाबतचा प्रस्ताव रविवारी (दि.१८) जिल्हाधिका-यांकडे पाठविण्यात आला असल्याचे तहसीलदार(निवडणूक)यांनी प्रसिद्धीपत्रकाव्दारे कळविले आहे.

Stay Connected

1,567FansLike
186FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या