27.1 C
Latur
Wednesday, July 6, 2022
Homeपरभणीघरगुती ग्राहकांसाठी महावितरणचा फंडा; वीजबिल भरा, बक्षीस मिळवा!

घरगुती ग्राहकांसाठी महावितरणचा फंडा; वीजबिल भरा, बक्षीस मिळवा!

एकमत ऑनलाईन

पूर्णा : वीजबिल भरणा-यांना प्रोत्साहन मिळावे आणि नियमित बिल भरण्याची सवय लागावी या उद्देशाने महावितरणने औरंगाबाद प्रादेशिक कार्यालयांतर्गत येणा-या घरगुती वीजग्राहकांसाठी नविन शक्कल लढवत बक्षीस योजना आणली आहे. १ जून ते ३0 ऑगस्टदरम्यान बिल भरणा-या ग्राहकांना या योजनेत बक्षिसे जिंकण्याची नामी संधी उपलब्ध झाली आहे.

ग्राहकांनी वापरलेल्या विजेचे बिल नियमित भरावे यासाठी महावितरण वारंवार आवाहन करते. परंतु, अनेक ग्राहक वेळेवर बिले भरत नसल्याने थकबाकी वाढत आहे. त्यामुळे महावितरणला वीजखरेदीसह इतर खर्चाचा ताळमेळ बसवणे जिकिरीचे झाले आहे. आता घरगुती ग्राहकांनी वीजबिल भरण्यास पुढाकार घ्यावा आणि त्यांना नियमित बिल भरण्याची सवय लागावी, यासाठी औरंगाबाद प्रादेशिक कार्यालयाचे सहव्यवस्थापकीय संचालक डॉ. मंगेश गोंदावले यांच्या संकल्पनेतून अभिनव बक्षीस योजना सुरू करण्यात येत आहे.

या योजनेचा कालावधी १ जून ते ३0 ऑगस्ट २0२२ असा आहे. या तीन महिन्यांत थकबाकीसह संपूर्ण वीजबिल भरणा-या घरगुती वीजग्राहकांमधून सोडत पद्धतीने बक्षिसे काढण्यात येणार आहेत. तिन्ही महिन्यांत बिल भरण्याच्या अंतिम मुदतीच्या आत सर्व बिले भरावी लागणार आहेत. महावितरणचे कर्मचारी वगळता मराठवाड्यातील सर्व घरगुती ग्राहकांसाठी ही योजना आहे. प्रत्येक महिन्याच्या १0 तारखेला सोडत काढण्यात येईल.

दर महिन्याला मराठवाड्यातील १0१ उपविभागातून एक हजार रुपयांची प्रत्येकी २ बक्षिसे दिली जाणार आहेत. त्यातील एक बक्षीस हे तत्पर देयक भरणा करणा-या ग्राहकास व दुसरे बक्षीस अंतिम मुदतीच्या आत बिल भरणा-या ग्राहकासाठी असेल.
ऑनलाईन बिल भरणा-या ग्राहकांमधून प्रत्येक महिन्याला मोबाईल हँडसेट किंवा टॅब्लेटचे एक विशेष बक्षीस दिले जाणार आहे.

यासोबतच दरमहा २२ विभागांतून प्रत्येकी एका मिक्सर ग्राइंडर, ९ मंडलांतून प्रत्येकी एक रेफ्रीजरेटर, ३ परिमंडलांतून प्रत्येकी एक एलईडी टीव्हीचे बक्षीस दिले जाईल. तर प्रादेशिक कार्यालय स्तरावर इलेक्ट्रिक स्कूटरचे बंपर बक्षीस दिले जाणार आहे, असे महावितरणने कळवले आहे.

Stay Connected

1,567FansLike
187FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या