34.4 C
Latur
Friday, April 23, 2021
Homeपरभणीजिंतूर रस्त्यावरील अतिक्रमणावर महापालिकेचा हातोडा

जिंतूर रस्त्यावरील अतिक्रमणावर महापालिकेचा हातोडा

एकमत ऑनलाईन

परभणी : शहरातील जिंतूर रस्त्यावर महापालिकेच्या जागेवर करण्यात आलेली सात अतिक्रमणावर बुधवारी (दि.24) महापालिकेचा हातोडा पडला. महापालिकेच्या अतिक्रमणविरोधी पथकाने ही सर्व अतिक्रमणे जमिनदोस्त केली. यावेळी एका अतिक्रमण धारकाने गोंधळ घालत आत्मदहणाचा प्रयत्न केल्याने काही काळ त्या ठिकाणी तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. नानलपेठ पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक कुंदनकुमार वाघमारे यांच्यासह कर्मचा-यांनी तातडीने हस्तक्षेप करीत आत्मदहनाचा प्रयत्न करणा-यास ताब्यात घेतले.

महापालिकेचे आयुक्त देविदासराव पवार यांनी शहरातील अतिक्रमणे काढण्याची मोहीम हाती घेतली आहे. शासकीय तथा महापालिकेच्या जागेवर करण्यात आलेली अतिक्रमणे जमीनदोस्त करण्याच्या सुचना त्यांनी पथकास दिल्या आहेत. जिंतूर रस्त्यावरील महापालिकेच्या जागेवर काही जणांनी अतिक्रमण केल्याची तक्रार आयुक्त पवार यांना श्री. मकसूद यांनी केली होती. मात्र, आपल्या तक्रारींकडे महापालिका प्रशासन दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप करीत त्यांनी आत्मदहनाचा इशारा दिला होता. या पार्श्वभूमीवर आयुक्त श्री. पवार यांनी तक्रारींबाबत शहानीशा करून बुधवारी ते अतिक्रमण जमीनदोस्त करण्याच्या सूचना दिल्या होत्या.

महापालिकेचे उपायुक्त देविदास जाधव, सहाय्यक आयुक्त महेश गायकवाड, सहाय्यक आयुक्त संतोष वाघमारे, शहर अभियंता श्री. वसिम, अभियंता पवन देशमुख, श्रीकांत कु-हा, मुख्य स्वच्छता निरीक्षक करण गायकवाड, इलेक्ट्रीकल अभियंता श्री.सोहेल यांच्यासह कर्मचा-यांनी बुधवारी दुपारी जिंतूर रस्त्यावरील सात अतिक्रमणे जमीनदोस्त केली. दरम्यान, अतिक्रमित जागेवर राहणा-या व्यक्तीने शासकीय कामात अडथळा निर्माण करण्याचा प्रयत्न करण्यासह गोंधळ घातल्या प्रकरणी नानलपेठ पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.

योगगुरूंचा असत्ययोग!

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,483FansLike
172FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या