30.6 C
Latur
Friday, May 14, 2021
Homeपरभणीसेलू-चिकलठाणा येथे सात वर्षीय बालकाचा खुन

सेलू-चिकलठाणा येथे सात वर्षीय बालकाचा खुन

एकमत ऑनलाईन

सेलु तालुक्यातील चिकलठाणा येथील एका सात वर्षीय बालकाचा त्याच्या चुलत आजोबाने गळा आवळून व नंतर विळ्याने वार करून निर्घृण खून केल्याची धक्कादायक घटना (दि.12/10) सोमवारी दुपार च्या सुमारास घडली. अभिराज श्रीराम जाधव असे या मृतक बालकाचे नाव असून चुलत आजोबा डिगंबर जाधव यास पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. घटनेचे नेमके कारण अद्याप समजू शकेल नाही.

अभिराज हा घरासमोर खेळत होता. त्यावेळी डिगांबर जाधव वय 56 यांनी त्याचा अचानक गळा दाबावयास सुरवात केली. अभिराज याच्या आईच्या तो प्रकार निदर्शनास आला. तेव्हा त्या धावून आल्या व डिगांबर जाधव याच्या तावडीतून अभिराज याची सुटका करण्याचा प्रयत्न केला. परंतु डिगंबर याने त्याच्या हातातील विळ्याने अभिराज याच्या छातीवर व पोटावर वार केले. त्यामुळे गंभीर अवस्थेत अभिराज यास सेलू येथील उपजिल्हा रुग्णालयात नातेवाईकांनी धावपळ करीत दाखल केले. परंतु अभिराज यास वैद्यकीय अधिकार्‍यांनी मृत घोषित केले.

सेलू पोलिसांना घटनेची माहिती समजताच पोलिस निरीक्षक वसुंधरा बोरगावकर, सहाय्यक पोलिस निरीक्षक विजय रामोड यांच्यासह कर्मचार्‍यांनी घटनास्थळी धाव घेतली. दिगांबर जाधव यास ताब्यात घेतले. या घटनेचा अधिक तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक विजय रामोड हे करीत आहे.

मुंबईतील वीज खंडित प्रकरणाची संपूर्ण चौकशी करण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,495FansLike
186FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या