26.9 C
Latur
Monday, June 14, 2021
Homeपरभणीसोशल मिडीयावर अश्लील छायाचित्र टाकणा-या तरूणाचा खून

सोशल मिडीयावर अश्लील छायाचित्र टाकणा-या तरूणाचा खून

एकमत ऑनलाईन

परभणी : जालना जिल्ह्यातील पिंपळवाडी येथील तरुणाने सोशल मीडियावर विवाहितेचे अश्लील फोटो टाकले होते. याचा राग मनात ठेवून विवाहिता व तिच्या नातेवाईकांनी संगनमत करून त्या तरुणाचा खून केल्याची घटना बुधवारी (दि.१२) रोजी खैरी (ता सेलू) येथे घडली. या प्रकरणी तीन आरोपींविरोधात चारठाणा पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

चारठाणा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील खैरी येथील एका विवाहितेचे काही दिवसांपूर्वी पिंपळवाडी येथील संतोष डिघोळे याच्यासोबत संबंध निर्माण झाले होते. परंतु काही कारणांवरून दोघांमध्ये भांडणे झाली होती. यावरून आपल्या माहेरी असलेल्या त्या महिलेला तो तरुण सतत त्रास देत होता. भांडणाचा राग मनात धरून डिघोळे हा त्या महिलेसोबतचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल करून त्या महिलेची बदनामी करत होता.

डिघोळे याच्या या कृत्याने विवाहितेची सर्वत्र बदनामी होत होती. याचा राग अनावर झाल्यामुळे डिघोळे याला धडा शिकवण्याचे विवाहिता व तिच्या घरच्यांनी ठरवले. त्यानंतर संगनमत करून विवाहिता, तिचे वडील व भाऊ यांनी डिघोळे यास गोड बोलून खैरी येथे बोलावून घेतले. त्यानंतर डिघोळे याच्या डोळ्यांत मिरची पूड टाकून लाठ्या-काठया व दगडाने जबर मारहाण करण्यात आली. या मारहाणीत डिघोळे याचा जागेवरच खून केला.

खुनाच्या या घटनेबाबतची माहिती चारठाणा पोलिसांना मिळाल्यानंतर सहाय्यक पोलीस निरीक्षक बळवंत जमादार, पोलीस उपनिरीक्षक प्रदीप अल्लापुरकर, पो.कॉ पवन राऊत, जानगर , बळीराम इघारे, दत्तात्रय भानुसे यांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेऊन माहिती घेतली व पंचनामा केला. प्रेत शवविच्छेदन करण्यासाठी सेलू येथील उपजिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले.

या प्रकरणी पोलीस पाटील हनुमंत दादाराव घुगे यांच्या फिर्यादीवरून चारठाणा पोलीस ठाण्यात तीन आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटनास्थळी पोलीस उपविभागीय अधिकारी श्रवण दत्त यांनी भेट दिली असून या प्रकरणाचा तपास सहायक पोलीस निरीक्षक बळवंंत जमादार हे करीत आहेत.

विदेशी लसींचा भारतात येण्याचा मार्ग मोकळा

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,527FansLike
201FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या