22.4 C
Latur
Thursday, September 29, 2022
Homeक्राइममनसे शहराध्यक्ष सचिन पाटील यांचा खून

मनसे शहराध्यक्ष सचिन पाटील यांचा खून

एकमत ऑनलाईन

परभणी: महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे शहराध्यक्ष सचिन पाटील यांचा वसमत रस्त्यावरील शिवराम नगरात मंगळवारी (ता.6) च्या मध्यरात्री तिक्ष्ण हत्याराने वार करून खुन झाल्याची घटना घडली.वसमत रोडवरील शिवनगरात सचिन पाटील हे आपल्या मित्रांबरोबर रात्री उशिरा पर्यंत गप्पा मारत बसले होते; त्यावेळी एका मित्रासोबत त्यांचा वाद झाला या वादातून तो प्रकार घडला अशी माहिती समोर येत आहे.

दरम्यान घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले होते. सचिन पाटील यांच्या मानेवर ब्लेडने वार केल्याचे आढळून आले आहे त्यांची भाऊ व सहकार्यांनी त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल केले मात्र मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव झाल्याने त्यांचे निधन झाले.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या