24.7 C
Latur
Friday, September 30, 2022
Homeपरभणीप्रेम प्रकरणातून यशपाल यादवचा खून

प्रेम प्रकरणातून यशपाल यादवचा खून

एकमत ऑनलाईन

परभणी : शहरातील उड्डान पुलाशेजारी असलेल्या मोकळ्या जागेत सोमवार, दि. २९ ऑगस्ट रोजी सकाळी उड्डान पुलाशेजारील मोकळ्या जागेत यशपाल यादव या २० वर्ष वयाच्या युवकाचा मृतदेह आढळला होता. या प्रकरणी कोतवाली पोलिसांनी दोन आरोपींना ताब्यात घेवून पोलिसी खाक्या दाखवताच प्रेमप्रकरणातून खून केल्याची कबुली दिलीÞ. दरम्यान यातील एका आरोपीला न्यायालयात हजर केले असता ३ सप्टेंबर पर्यंत पोलीस कोठडी देण्यात आली आहे. तर अन्य एक आरोपी अल्पवयीन असल्याने त्याची बाल सुधारगृहात रवानगी केली असल्याची माहिती पोलिस निरीक्षक शरद ज-हाड यांनी दिली.

शहरातील रमाबाई आंबेडकर नगर येथील यशपाल गोविंद यादव हा युवक रविवार, २८ ऑगस्ट रोजी रात्री ९ वाजताच्या सुमारास आईला बाहेर जावून येतो असे म्हणून घराबाहेर पडला होताÞ या युवकाचा सोमवारी उड्डान पुलाशेजारील गोरक्षणच्या मोकळ्या जागेवर मृतदेह आढळून आला होता. Þघटनेची माहिती मिळताच कोतवाली पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक शरद ज-हाड, सपोनिÞ रामेश्वर तुरनर, पोलीस कर्मचारी गायकवाड, पोले, भोळे, जंगम, स्थागुशाचे पो.नि. चव्हाण व त्यांचे पथक घटनास्थळी दाखल झालेÞ पोलिसांनी घटनास्थळी पाहणी केली असता मृत युवकाच्या गळ्यावर धारदार शस्त्राचे वार आढळून आले होते. तसेच मृतदेहाच्या ठिकाणी दारूच्या बाटल्याच्या काचेचे तुकडे आढळून आल्याने यशपालचा खून झाला असल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला होता.

दरम्यान या प्रकरणी पोलिस निरीक्षक शरद ज-हाड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस पथकाने संशयीत आरोपी करण रावसाहेब बनसाडे व त्याच्या अल्पवयीन भावास ताब्यात घेतलेÞ त्यानंतर या दोघांनीही पोलिसी खाक्या दाखवताच आरोपींनी प्रेम प्रकरणातून यशपालचा खून केल्याची कबुली दिलीÞ या प्रकरणी करण बनसोडे याला न्यायालयात हजर केले असता ३ सप्टेंबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहेÞ तर दुसरा आरोपी अल्पवयीन असल्याने त्यास बालसुधारगृहात पाठवण्यात आले असल्याची माहिती पो. नि. ज-हाड यांनी दैनिक एकमत प्रतिनिधीशी बोलताना दिली.

दरम्यान कोतवाली पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक शरद ज-हाड यांनी यापुर्वी देखील शहरातून बेपत्ता असलेल्या युवकाच्या प्रकरणात तत्परतेने सुत्रे हालवत काही आरोपींना ताब्यात घेवून पोलीस खाक्या दाखवला होताÞ त्यानंतर आरोपींनी दिलेल्या माहितीवरून बोरवंड शिवारातून या बेपत्ता व्यक्तीचा मृतदेह शोधून काढला होताÞ आता देखील दोन दिवसापुर्वी घडलेल्या यशपाल यादवच्या खून प्रकरणात दोन आरोपींना ताब्यात घेवून खुनाचा उलगडा केला आहेÞ पोलिस निरीक्षक शरद ज-हाड यांच्या या कामगिरीमुळे कोतवाली पोलिस ठाण्याच्या हद्दीतील गुन्हेगारीला मोठ्या प्रमाणावर आळा बसल्याचे दिसून येत आहेÞ

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या