24.3 C
Latur
Thursday, June 24, 2021
Homeपरभणीडोंगरगाव पूल येथील चिमुकल्या बहीण,भावाचा गुढ मृत्यू

डोंगरगाव पूल येथील चिमुकल्या बहीण,भावाचा गुढ मृत्यू

एकमत ऑनलाईन

आखाडाबाळापुर : डोंगरगाव पूल येथील ही दोन बालके त्यांच्या आईसोबत हादगाव तालुक्यातील कोहळी येथे मामाच्या गावी गेली होती. गुरुवारी रात्री त्यांना जेवणानंतर ठसका लागल्यानंतर बराच वेळ ठसका थांबेना. त्यामुळे त्यांना हादगाव जवळील निवघा बाजार येथे रुग्णालयात देण्यात आले. परंतू औषधो उपचार करून मुलीला आखाडा बाळापूर येथे रुग्णालयात घेऊन येत असताना तिचाही रस्त्यातच मृत्यू झाला.

याबाबत सविस्तर वृत्त असे की आखाडा बाळापूर पासून ३ कि.मी.अंतरावर असलेल्या डोंगरगाव पूल येथील अमोल शिंदे यांची पत्नी सौ.पल्लवी हि आपली चिमुकली मुले आर्यन वय ३वर्ष व मुलगी आराध्या वय १ वर्ष यांच्या समवेत हदगाव तालुक्यातील कोहळी या गावी दोन दिवसांपूर्वी आपल्या माहेरी गेले होती. दि.२२आक्टो.रोजी जेवनानंतर कु.आराध्या ला उलट्या व ठसका लागल्याने व उलट्या जास्त प्रमाणात होत असल्याने डोंगरगाव पुल आणल्यावर दि.२३ आक्टो.सकाळी दुर्दैवी मृत्यू झाला तर मुलीच्या अंत्यविधीची तयारी सुरू असताना मुलगा आर्यन हा ही मामाच्या गावी याच कारणामुळे मृत्यू झाल्याचे निरोप आल्याने परिवार दु:खात बुडाले.

आखाडा बाळापूर येथील रुग्णालयात मुलींचे तर मुलाचे निवघा बाजार येथील शासकीय रुग्णालयात शवविच्छेदन करण्यात आले असून त्यानंतरच मृत्यूचे कारण समोर येणार आहे. या दुर्दैवी घटनांमुळे परिसरात खळबळ उडाली असून हळहळ व्यक्त होत आहे.

बालकाच्या नरबळी प्रकरणी ६ जणांना जन्मठेपेची शिक्षा

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,527FansLike
202FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या