19 C
Latur
Sunday, November 27, 2022
Homeपरभणीकोरोनामुळे हरंगुळ येथील नागपंचमीची यात्रा रद्द

कोरोनामुळे हरंगुळ येथील नागपंचमीची यात्रा रद्द

एकमत ऑनलाईन

गंगाखेड : तालुक्यातील मौजे हरंगुळ या ठिकाणी आज दि.२५ जुलै होणारी याञा करोनाच्या पाश्वर्भूमीवर भाविकांची मोठ्या प्रमाणात होणारी गर्दी लक्षात घेता प्रशासनाच्या वतीने रद्द करण्यात आली आहे.

नवनाथाची नऊ तिर्थक्षेत्र असुन या तिर्थक्षेत्रापैकी एक श्रीक्षेत्र हरंगुळ आहे.नागपंचमीच्या दिवशी राजा भर्तृहरीनाथाच्या भस्म समाधीचे दर्शन घेण्यासाठी संपूर्ण भारतातुन एक लाखापेक्षा अधिक भाविक येतात.सर्व धर्मीयाचे श्रध्दास्थान म्हणुन श्रीक्षेत्र हरंगुळ ओळखले जाते.संपूर्ण देशात प्रसिद्ध असलेले श्रीक्षेत्र हरंगुळ येथिल राजा भर्तृहरीनाथाची समाधी आहे. मावळ प्रांताची मध्यप्रदेश राजधानी उज्जैनचा राजा भर्तृहरी हे राजा विक्रमादित्याचे थोरला भाऊ होते.

लहान भावाच्या योग्यतेबद्दल पुर्ण विश्वास ठेऊन राजवैभवाचा त्याग करून वैराग्य धारण केले.राजा भर्तृहरी याचा नीतिशतक हा ग्रंथ जगात सर्व नितिविषयक ग्रंथात सर्व श्रेष्ठ मानला जातो. जगाच्या कल्याणासाठी त्यानी केलेल्या कार्याच्या कथा या देशभर प्रसिद्ध आहेत.रानावणात फिरून कठिण जीवन जगत त्यानी जनकल्याचा मार्ग स्विकारल्याचे सांगितले जाते.राजा भर्तृहरीनाथ नऊ नाथापैकी एक असुन त्याची भस्म समाधी श्रीक्षेत्र हरंगुळ येथे आहे पंचमीच्या दिवशी येथे भव्य जत्रा भरते.यावर्षी ता.२५ जुलैला होणारी याञा रद्द करण्यात आली आहे.

या एकवताच्या दिवशी मोठ्या संख्येने महिला भाविक राजा भर्तृहरीनाथाच्या भस्म समाधीचे दर्शन घेण्यास येतात पण हि याञा करोना मुळे रद्द झाल्याची माहीती सहाय्यक पोलीस निरीक्षक राजेश राठोड व टी.टी.शिंदे यांनी कळवले आहे.

Read More  नांदेड जिल्ह्यात सरासरी १७.०२ मि.मी. पाऊस

Stay Connected

1,567FansLike
187FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या