27 C
Latur
Tuesday, July 5, 2022
Homeपरभणीपरभणीच्या नम्रता मुंदडाची मंत्रालयात कक्ष अधिकारी म्हणून निवड

परभणीच्या नम्रता मुंदडाची मंत्रालयात कक्ष अधिकारी म्हणून निवड

एकमत ऑनलाईन

परभणी : राज्यसेवा मुख्य परीक्षा (एमपीएससी) २०२०चा अंतिम निकाल लागला असून, यात परभणी येथील नम्रता विजयकुमार मुंदडा या विद्यार्थिनीने मुलींमध्ये सामान्य गुणवत्ता यादीत राज्यात १०वा तर ईडब्ल्यूएसमध्ये राज्यात चौथा क्रमांक पटकावत घवघवीत यश संपादन केले. तिची मंत्रालय मुंबई येथे कक्ष अधिकारी (सेक्शन ऑफिसर) पदी निवड झाली आहे.

परभणी येथील जेष्ठ पत्रकार विजयकुमार मुंदडा यांची कन्या नम्रता हिचे प्राथमिक शिक्षण परभणी येथील सारंग स्वामी विद्यालयात झाले. उच्च माध्यमिक शिक्षण तिने पुणे येथील फर्ग्युसन महाविद्यालयात पूर्ण केले, तर अभियांत्रिकीची पदवी पुणे विद्यापीठातून घेतली. नम्रताने अधिकारी व्हावे अशी तिची आई स्व. उज्जला मुंदडा यांची इच्छा होती.

अभियांत्रिकीचे शिक्षण पूर्ण झाल्यानंतर नम्रताने पुणे तसेच परभणीत राहून मोठे बंधू विक्रीकर अधिकारी सतीश मुंदडा यांच्या मार्गदर्शनाखाली राज्यसेवा आयोगाच्या परीक्षेची तयारी सुरु केली. अभ्यासातील सातत्य, मनात असलेल्या जिद्दीच्या जोरावर नम्रताने हे यश संपादन केल्याचे तिचे बंधू विवेक व विशाल मुंदडा यांनी सांगितले.

राज्यसेवा मुख्य परीक्षा (एमपीएससी) २०२०मध्ये पार पडल्यानंतर तब्बल दोन वषार्नंतर अंतिम निकाल लागला. महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे घेण्यात आलेल्या राज्यसेवा मुख्य परीक्षा २०२० चा निकाल महिनाभर आधी जाहीर करण्यात आला होता. २९ एप्रिल रोजी गुणवत्ता यादी जाहीर करण्यात आली होती. त्यानंतर आज अंतिम निकाल जाहीर करण्यात आला. या यशाबद्दल तिचे सर्वत्र कौतुक होत आहे.

उपजिल्हाधिकारी होण्याचे ध्येय
कक्ष अधिकारी म्हणून यश मिळवले असले तरी या यशाला हुरळून न जाता उपजिल्हाधिकारी होण्यासाठी आणखी प्रयत्न करणार असल्याचे नम्रताने म्हटले आहे.

Stay Connected

1,567FansLike
187FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या