21.1 C
Latur
Tuesday, September 28, 2021
Homeपरभणीनांदेड- औरंगाबाद विशेष रेल्वे रद्द

नांदेड- औरंगाबाद विशेष रेल्वे रद्द

एकमत ऑनलाईन

परभणी : जालना ते बदनापूर सेक्शनमधील दिनेगाव रेल्वे स्थानकावर २५ जुलै ते ९ ऑगस्ट दरम्यान दुपारी ३.३० ते ६.३० वाजेपर्यंत रोज ०३ तासांचा लाईन ब्लॉक घेण्यात येणार आहे. त्यामुळे या मार्गावरून धावणारी नांदेड ते औरंगाबाद साप्ताहिक विशेष रेल्वेगाडी शुक्रवार दि.३० ते ०६ ऑगस्ट या कालावधीत पूर्णत: रद्द करण्यात आली आहे. या ब्लॉकचा इतर गाड्यांवरही परिणाम होणार आहे. त्यामुळे काही रेल्वे रद्द करण्यात आल्या आहेत. तर काही रेल्वे उशीराने धावणार असल्याची माहिती दक्षिण मध्य रेल्वे नांदेड विभागातील जनसंपर्क विभागाने दिली आहे.

दिनेगाव येथे घेण्यात येणा-या ब्लॉकमुळे गाडी संख्या ०७६१९ नांदेड ते औरंगाबाद साप्ताहिक विशेष गाडी ३० जुलै ते ०६ ऑगस्ट दरम्यान पूर्णत: रद्द करण्यात आली आहे. गाडी संख्या ०७०५० औरंगाबाद ते हैदराबाद विशेष गाडी २५ जुलै ते ०९ ऑगस्ट दरम्यान औरंगाबाद रेल्वे स्थानकावरून रोज १२५ मिनिटे उशिराने सुटणार आहे. या गाडीची औरंगाबाद स्थानकावरून सुटण्याची वेळ दुपारी ४.१५ आहे. परंतू ब्लॉकमुळे ही गाडी औरंगाबाद येथून सायंकाळी ६.२० वाजता सुटणार असल्याचे रेल्वे विभागाने म्हटले आहे. गाडी संख्या ०७६५३ हैदराबाद ते पूर्णां विशेष गाडी २६ जुलै ते १० ऑगस्ट दरम्यान हैदराबाद येथून ९० मिनिटे उशिरा निघणार आहे. या गाडीची नियमित वेळ सकाळी ८.२० वाजताची असून त्या ऐवजी ९.३० वाजता ही गाडी सुटणार असल्याची माहिती नांदेड रेल्वे विभागाकडून देण्यात आली आहे.

यापुर्वीही मध्य रेल्वे विभागात झालेल्या जोरदार अतिवृष्टीमुळे मुंबईकडे जाणा-या नंदीग्राम, तपोवन, राज्यराणी, पनवेल या एक्सप्रेस रेल्वेगाड्या रद्द करण्यात आल्याचे नांदेड रेल्वे विभागाने कळवले होते. त्यानंतर दोनच दिवसांत दिनेगाव रेल्वे स्थानकावरील ब्लॉकमुळे काही गाड्या रद्द तर काही उशीराने धावणार असल्याचे सांगण्यात आले आहे. या सर्व प्रकारामुळे प्रवाशांना मात्र गैरसोयीचा सामना करावा लागणार आहे.

हिमाचल प्रदेशात पूल कोसळून ९ पर्यटकांचा मृत्यू

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,527FansLike
194FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या