24.3 C
Latur
Thursday, June 24, 2021
Homeपरभणीनांदेड-पनवेल आजपासून धावणार

नांदेड-पनवेल आजपासून धावणार

एकमत ऑनलाईन

परभणी : कोरोना विषाणूच्या संसर्गामुळे गेल्या सात महिन्यापासून बंद असलेल्या रेल्वे सुरु होतअसून आज पासून नांदेड पनवेल ही .एक्सप्रेस तर शनिवार पासून धर्माबाद मनमाड ही विशेष रेल्वे सुरु होत असल्याने प्रवाशांमधून समाधान व्यक्त होत आहे. कोरोना विषाणूच्या संसर्गामुळे सर्वत्र लॉकडाऊन करण्यात आले् होते यामुळे रेल्वे तसेच बस वाहतूकही बंद कर.ण्यात आली होती. दोन महिन्यापुर्वीच बस वाहतूक सुरु झाली . परंतू रेल्वे वाहतूक मात्र सुरु न झाल्याने प्रवाशामधून नाराजी व्यक्त होत होती. हळूहळू रेल्वे सुरु करण्याय्च्या प्रक्रिया सुुरु केल्या आहेत. पुणे मुंबई-नाशीक,औरंगाबादला जाणा-या प्रवाशांसाठी सोयीचे होणार आहे. दरम्यान या रेल्वे प्रवाशांना आरक्षण करावे लागणार आहे.

नांदेड येथून शुक्रवार दि. २३ रोजी सायं. ५.३० वा पनवेल एक्स्प्रेस सुटेल. पूर्णा येथे६.०६ वा., परभणी ७.३० वा.,गंगाखेड ७.१४ वा. परळी वैजनाथ ८.१५ वा., लातूर रोड ९.५५ वा, लातूर १०.५५ वा. उस्मानाबाद १२.१८ वा. कुडूर्वाडी रात्री २ वा., पुणे येथे स. ६.१५ वा. पनवेल येथे स. ९ वा पोहचणार आहे. तर शनिवार दि. २४ रोजी पनवेलहून साय.४ वा. निघणार असून लोनावळा, तळीगाव, चिंचवड, पुणे, दौंड, कुडूर्वाडी, उस्मानाबाद, लातूर, लातूर रोड, परळी वैजनाथ येथे स. ५.४० वा. तर परभणीत स. ७.२८, नांदेड येथे स.९.१५ वाजता पोहचणार आहे. दरम्यान ही रेल्वे सुरू झाल्याने पुणे व मुंबईला जाणा-या प्रवाशांमधुन समाधान व्यक्त होत आहे.

तर धर्माबाद -मनमाड ही एक्सप्रेस शनिवारी सुरु होणार आहे. काचीकुडा ते मनमाड या रेल्वे मार्गावर शनिवार पासून धर्माबाद मनमाड धर्माबाद ही विशेष रेल्वे सुरु होणार आहे. पुर्वी धावणा-या मराठवाडा एक्सप्रेसच्या वेळेतच ही विशेष रेल्वे सुरु करण्यात आली आहे. शनिवारी धर्माबाद येथून सकाळी ४ वा. ही गाजी सुटणार असून नांदेड येथे ५.२८ , पुर्णा येथे ६.०३ मि. तर परभणी ये.थे ६.३८ मि. मानवत रोड येथे ६.५७ मि.सेलू येथे ७,१७ मि, परतूर येथे ७.४४ ,रांजणी येथे ७.५४, जालना येथे ८.२८ मि.बदनापूर येथे ८.४९ , मुकुंदवाडी ९.२९ तर औरंगाबाद ये.थे १०.०५ मि. लासूर येथे १०.४१, परसगाव १०.५४, रोटेगाव ११.१९ व मनमाड स्थानकावर १.२० मि. पोहचणार आहे. तर परतीच्या प्रवासात दु. ३.०० वा. गाडी सुटणार असून अकंई, रोटेगाव,परसगाव, लासूर,मार्गे औरंगाबाद स्थानकात ५.५० मि. मुकुदवाडी ६.११, बदनापूर ६.३६, जालना ५.५०, परतूर ७.२९, सेलू ७.५१,मानवत रोड ८.०४ , परभणी ८.४३ पुर्णा ९.३३, नांदेड १०.०८ ,तर धर्माबाद ये.थे रात्री १२.१० ला ही गाडी पोहचणार आहे. या रेल्वे सुरु होणार अस्ल्यााने प्रवाशामधून समाधान व्यक्त होत आहे. दरम्यान या रेल्वेला प्रवासापुर्वी आरक्षण करणे गरजेचे आहे. आरक्षणाशिवाय प्रवास करता येणार नाही.

रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्हा प्रशासनाने वैद्यकीय महाविद्यालयासाठी जागा निश्चित कराव्यात – अमित देशमुख

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,527FansLike
202FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या