20.9 C
Latur
Tuesday, September 28, 2021
Homeपरभणीनंदीग्राम, तपोवन, राज्यराणी एक्सप्रेस रद्द

नंदीग्राम, तपोवन, राज्यराणी एक्सप्रेस रद्द

एकमत ऑनलाईन

परभणी : मध्य रेल्वे विभागातील इगतपुरी-कसारा- कल्याण घाटामध्ये होत असलेल्या अतिवृष्टीमुळे दरड कोसळण्याच्या घटना घडल्या आहेत. त्यामुळे अनेक ठिकाणी रेल्वे मार्गावर मातीचे ढिगारे पडले आहेत. तसेच काही ठिकाणी रेल्वे मार्गावर पाणी आले असून काही ठिकाणी रेल्वे मार्गच वाहून गेला आहे. त्यामुळे मध्य रेल्वेने नांदेड विभागातून जाणा-या काही विशेष रेल्वे गाड्या रद्द करण्यात आल्या असल्याची माहिती नांदेड रेल्वे विभागाने दिली आहे.

नांदेड विभागातील रद्द करण्यात आलेल्या विशेष रेल्वे गाड्या पुढील प्रमाणे आहेत. यात मुंबई- आदीलाबाद विशेष नंदिग्राम एक्सप्रेस २५, २६ आणि २७ जुलै रोजी रद्द असणार आहे. तर आदिलाबाद -मुंबई नंदीग्राम एक्सप्रेस २५, २६, २७ व २८ जुलै रोजी पूर्णत: रद्द असणार आहे. तसेच नांदेड -मुंबई राज्यराणी विशेष एक्सप्रेस २५, २६ आणि २७ जुलै रोजी रद्द असणार आहे.

तर मुंबई -नांदेड ही राज्यराणी विशेष एक्सप्रेस रेल्वे २५, २६, २७ व २८ जुलै रोजी रद्द असणार आहे. रद्द करण्यात आलेली तिसरी गाडी पनवेल- नांदेड विशेष एक्सप्रेस रेल्वे असून ही गाडी २५, २६, २७ व २८ जुलै रोजी पूर्णत:रद्द राहणार आहे. तर नांदेड -पनवेल विशेष एक्सप्रेस रेल्वे २५,२६ व २७ जुलै रोजी रद्द असणार आहे. नांदेड मुंबई तपोवन एक्सप्रेस २५, २६ आणि २७ जुलै रोजी पूर्णपणे रद्द असणार आहे. तर मुंबई नांदेड तपोवन एक्सप्रेस २५,२६, २७ व २८ जुलै रोजी रद्द असणार करण्यात आली असल्याची माहिती नांदेड येथील दक्षिण मध्य रेल्वे विभागाच्या जनसंपर्क विभागाने दिली आहे.

मध्य रेल्वे विभागात होत असलेल्या अतिवृष्टीमुळे नांदेड विभागातील विशेष एक्सप्रेस रेल्वे गाड्या रद्द करण्यात आल्या असल्याने मुंबईस कामानिमित्त जाणा-या प्रवाशांना मात्र मोठ्या प्रमाणात गैरसोयीचा सामना करावा लागणार आहे.

बनावट महिला वकिलाची स्वक्षेत्रात मोठी झेप

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,527FansLike
194FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या