परभणी : अल्फाजुहा वार.एम.सी टेबल टेनिस हॉलमध्ये रविवार, दि.१९ फेब्रुवारी रोजी कॅडेट व सबज्युनियर (११, १३, १५) वर्ष वयोगटाच्या ८४ वी राष्ट्रीय अजिंक्यपद टेबल टेनिस स्पर्धेला प्रारंभ झाला. स्पर्धेचे उद्घाटन भारतीय टेबल टेनिस महासंघाचे महासचिव कमलेश मेहता, डॉ.देवनाथन यादव, नागेश्वर रेड्डी आदी मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.
या स्पर्धेत महाराष्ट्राच्या संघात कु.आद्या बाहेती, मायरा सांगलेकर, आरशया राय, आर्या रेडकर, इशिका उमाटे, जेनीफर वरगेस, दिव्यांशी भौमिक, रीयाना भूता, स्वरा जगडे, नायश रेवासकर यांचा समावेश आहे. तर राजू सावंत, सचिन डिसूजा, अर्जुन पात्रा हे प्रशिक्षक आहेत.
या स्पर्धेत भारतातील सर्व राज्यातील टेबल टेनिस ११ व १३ वर्षे खालील सहभागी खेळाडू एकेरी व दुहेरी प्रकारात आपले कौशल्य दाखवणार आहेत. १५ वर्षाखालील गटातील खेळाडू एकेरी, दुहेरी आणि सांघिक अशा प्रकारांमध्ये आपापले कौशल्य दाखवणार आहेत. स्पर्धेला १५ वर्षाखालील गटाच्या संघिक प्रकारानुसार सुरुवात झाली. स्पर्धेचा पहिला टप्पा साखळी पद्धतीने होणार असून महाराष्ट्र संघाला तिस-या ग्रुपमध्ये अव्वल स्थान देण्यात आले आहे. महाराष्ट्राला पंजाब व गोवा संघाचे आव्हान असणार आहे.