26.6 C
Latur
Thursday, August 18, 2022
Homeपरभणीराष्ट्रवादीचे दिनेश परसावत भाजपात

राष्ट्रवादीचे दिनेश परसावत भाजपात

एकमत ऑनलाईन

परभणी : राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी दिनेश परसावत यांनी भारतीय जनता पक्षात जाहीर प्रवेश केला. यावेळी संघटनमंत्री संजय कौडगे यांनी त्यांचे स्वागत केले. परभणी येथे श्री शिवाजी महाविद्यालयाच्या सभागृहात झालेल्या भारतीय जनता पक्षाच्या बैठकीत त्यांनी प्रवेश केला. यावेळी माजी आमदार रामप्रसाद बोर्डीकर, भाजपाचे ज्येष्ठ नेते विजयराव वरपुडकर, भाजपा शहर जिल्हाध्यक्ष आनंद भरोसे, ग्रामीण जिल्हाध्यक्ष डॉ़ सुभाष कदम, प्रमोद वाकोडकर, समीर दुधगावकर आदींची उपस्थिती होती.

दिनेश परसावत यांनी युवक काँग्रेसचे १५ वर्ष जिल्हाध्यक्षपद भुषविले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्थापनेनंतर ते परभणी राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्षपदी त्यांनी काम केले आहे. तसेच त्यांनी संजय गांधी निराधार योजनेच्या अध्यक्षांच्या माध्यमातूनही काम केले आहे. मागील अनेक वर्षापासून ते राजकारणात सक्रीय असून त्यांच्या भाजपा प्रवेशाने परभणीत राष्ट्रवादीला धक्का दिला आहे.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या