23.6 C
Latur
Tuesday, October 4, 2022
Homeपरभणीराष्ट्रवादी काँग्रेसचे सेलू-पाथरी रस्ता दुरूस्तीसाठी रास्तारोको आंदोलन

राष्ट्रवादी काँग्रेसचे सेलू-पाथरी रस्ता दुरूस्तीसाठी रास्तारोको आंदोलन

एकमत ऑनलाईन

पाथरी : सेलू-पाथरी रस्ता दुरूस्तीसाठी बुधवार, दि. १० ऑगस्ट रोजी शहरातील सेलू कॉर्नर येथे राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने रास्तारोको आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात शेकडो आंदोलक सहभागी झाल्याने वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. यावेळी राष्ट्रीय महामार्ग विभागाचे अधिकारी यांनी येत्या १० दिवसांत काम सुरू महिनाभरात काम पूर्ण करण्याचे आश्वासन दिल्यानंतर आंदोलन थांबवण्यात आले.

मागील अनेक वर्षांपासून सेलू-पाथरी-सोनपेठ या ५४८ बी राष्ट्रीय महामार्गाचे काम रखडलेले आहे. या संदर्भात अनेक तक्रारी आ. बाबाजानी दुर्राणी यांच्याकडे आल्या होत्या. या पार्श्वभुमीवर आज पाथरी शहरातील सेलू कॉर्नर येथे रास्तारोको आंदोलन करण्यात आलेÞ यावेळी आ. दुर्राणी यांनी या महार्गावर रेणुका व ंिलबा असे दोन कारखाने येतात. त्यामूळे शेतक-यांना ऊस नेण्यासाठी मोठी अडचण होत आहे. तसेच अनेक गावक-यांना याचा त्रास होत आहे.

असंख्य खड्ड्यामुळे वाहनांचे होणारे अपघाताची गंभीर दखल घेऊन आंदोलन करण्यात आल्याचे आ. दुर्राणी यांनी सांगितलेÞ यावेळी रस्ता दुरुस्तीचे आश्वासन मिळाल्याशिवाय कुठल्याही परिस्थितीत आंदोलन मागे घेणार नाही अशी भूमिका आ. दुर्राणी यांनी घेतली होती. त्यानंतर राष्ट्रीय महामार्ग विभागाचे अधिका-यांनी या ठिकाणी भेट देवून उपस्थितांना एका महिनाभरात रस्ता काम पूर्ण करण्याचे आश्वासन दिल्यानंतर रास्ता रोको आंदोलन थांबवण्यात आले.

या आंदोलनात परिसरातील शेकडो कार्यकर्ते, शेतक-यांनी सहभाग नोंदवत रस्ता अडवला होता. या आंदोलनात उपस्थित राहिल्याबद्दल सहकारी, पदाधिकारी, कार्यकर्ते, शेतकरी बांधव आणि नागरिकांचे आ. दुर्राणी यांनी आभार व्यक्त केले.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या