21.9 C
Latur
Monday, August 15, 2022
Homeपरभणीआरटीओ कार्यालयातील नेट गूल, नागरिकांच्या कामाचा खोळंबा

आरटीओ कार्यालयातील नेट गूल, नागरिकांच्या कामाचा खोळंबा

एकमत ऑनलाईन

परभणी : येथील प्रशासकीय इमारतीतील उप्रादेशिक परीवहन कार्यालयाती इंटरनेट मागील काही दिवसांपासून गूल होत आहे. त्यामुळे या ठिकाणी कामासाठी जिल्हाभरातून येणा-या नागरीकांना कामाविनाच हात हालवत परत जाण्याची वेळ येत आहे. इंटरनेट सेवा सुरळीत नसल्याने नागरिकांना आर्थिक भुर्दंडासह वेळेच्या अपव्ययास सामोरे जावे लागत असून या तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.

येथील उपप्रादेशिक परीवहन कार्यालयातील सर्व कामे ऑनलाईन करण्यात येतात. या ठिकाणी बीएसएनएलची इंटरनेट सेवा वापरण्यात येते़ परंतू गेल्या दोन दिवसांपासून जिल्हाभरात बीएसएनएलची इंटरनेट सुविधा ठप्प झाली आहे. याचा परिणाम उपप्रादेशिक परीवहन कार्यालयातील कामकाजावरही झाला आहे.

इंटरनेटअभावी नागरिकांचे गाडी ट्रान्सफर करण्याचे काम, परमिट काढणे, लायसन्स रिनीवल करणे, गाडीवरील कर्जाच्या बोजाची नोंद करणे आदी कामे ठप्प पडली आहेत़ यामुळे बाहेर गावहून कामासाठी येणा-या नागरिकांना इंटरनेटअभावी ऑनलाईन कामे होत नसल्याने आर्थिक भुर्दंडासह मानसिक त्रासास सामोरे जावे लागत आहे़ परंतू उपप्रादेशिक परीवहन कार्यालयातील अधिकारी व कर्मचा-यांना नागरीकांच्या गैरसोयीबाबत कुठलेच गांभीर्य नसल्याचे दिसून येत आहे.

त्यामुळे उपप्रादेशिक परीवहन अधिका-यांनी तात्काळ इंटरनेट सुविधा सुरळीत करून गैरसोय दूर करावी अशी मागणी नागरीकातून होत आहे.

पावसामुळे इंटरनेट सुविधेत अडथळा : अश्विनी स्वामी
उपप्रादेशिक परीवहन कार्यालयातील इंटरनेट असुविधेमुळे नागरीकांची कामे बंद पडली असल्याबाबत उपप्रादेशिक परीवहन अधिकारी अश्विनी स्वामी यांच्याशी संपर्क साधला असता त्या म्हणाल्या की, सध्या पावसामुळे इंटरनेट सुविधा चालू-बंद होत आहे़ याबाबत बीएसएनएलकडे वारंवार तक्रार केली आहे़ तसेच यासाठी सध्यातरी कुठलीही पर्यायी व्यवस्था उपलब्ध नसल्याने आपण काही करू शकत नसल्याचे अश्विनी स्वामी यांनी सांगितले़

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या