मानवत : येथील नेताजी सुभाष विद्यालयातील १९८८च्या दहावी इयत्तेतील वर्गमित्रांचा स्नेहमीलन कार्यक्रम रविवार, दि़१२ जून रोजी परभणी येथील फन पार्कमध्ये उत्साहात व आनंदात साजरा करण्यात आला.
या कार्यक्रमात सर्वप्रथम परिचयसत्र घेण्यात आले. सर्व मित्र मैत्रणिनी आपला परिचय करून दिला. यानंतर गप्पाचा कार्यक्रम रंगला. गायक मनोज बांगड, अनुजा गंदेवार, डॉ़सचिन चिद्रवार यांनी सादर केलेल्या गितांना वर्गमित्रांनी साथ दिली. दिवसभर एकत्रित जमलेल्या या वर्गमित्रांनी ख्याली, खुशाली विचारीत सायंकाळी कार्यक्रमाची सांगता केली.
या कार्यक्रमास मानवत, पाथरी, सोनपेठ, हिंगोली, नांदेड, औरंगाबाद, लातूर, आष्टी येथून ३७ वर्गमित्र उपस्थित राहिले होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन धोंडीराम ससे तर आभार डॉ़विठ्ठल करपे याने मानले. कार्यक्रमाचे नियोजन डॉ़प्रणित पोरवाल, सत्येन गुंडलवार, गोविंद राठी, अनुजा गंदेवार यांनी उत्कृष्टरित्या केले.