पाथरी : आ.बाबाजानी दुर्राणी यांच्या वतीने पाथरी तालुक्यातील माता भगिनींच्या कला गुणांना वाव देण्यासाठी गुरुवार, दिÞ१५ डिसेंबर रोजी न्यू होम मिनिस्टर खेळ पैठणीचा या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धामध्ये २०० पेक्षा अधिक आकर्षक बक्षीस ठेवण्यात आले आहेत. या स्पर्धामध्ये शहरासह तालूक्यातील महीलांनी मोठया संख्येने सहभागी होण्याचे आवाहन संयोजकाच्या वतीने करण्यात आले आहे.
राष्ट्रवादी कॉग्रेस पक्षाचे अध्यक्ष खा.शरद पवार यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून आ.दुर्राणी यांच्या वतीने पाथरी शहरातील शिक्षक कॉलनी परिसरातील माध्यमिक विद्यालयात गुरुवारी न्यू होम मिनिस्टर खेळ पैठणीचा या कार्यक्रमाचे आयोजन सायंकाळी ६ वाजता करण्यात आले आहे. या कार्यक्रमाचे संचलन सिनेअभिनेते क्रांती नाना मळेगावकर करणार आहेत.
या कार्यक्रमात विजेत्याा महिलांना तब्बल २०० पेक्षा जास्त आकर्षक बक्षिसे देण्यात येणार आहेत. यामध्ये प्रथम बक्षीस दुचाकी स्कुटी, द्वितीय बक्षीस फ्रिज तर तृतीय बक्षीस वाशिंग मशीन असून या व्यतिरिक्त विजेत्या महिलांसाठी जवळपास २०० बक्षिसे आहेतÞ या कार्यक्रमात पाथरी शहर व तालुक्यातील महिलांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन कार्यक्रमाचे संयोजक अलोक चौधरी यांनी केले आहे.