32 C
Latur
Friday, April 23, 2021
Homeपरभणीपरभणी जिल्ह्यात लागू होऊ शकते रात्रीची संचारबंदी

परभणी जिल्ह्यात लागू होऊ शकते रात्रीची संचारबंदी

एकमत ऑनलाईन

परभणी : कोरोना विषाणूच्या वाढत्या प्रादूर्भावाच्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाने अन्य जिल्ह्यांप्रमाणे लॉकडाऊन संदर्भात सुरू केलेल्या हालचालींना व्यापा-यांसह उद्योजकांनी जिल्हाधिकारी कार्यालयातील बैठकीतून तीव्र विरोध केला आहे. यावेळी जिल्हाधिकारी श्री.दिपक मुगळीकर यांनी व्यापा-यांचे म्हणणे ऐकल्यानंतर रात्रीच्या संचारबंदीचा निर्णय घ्यावा लागेल असे स्पष्ट केले.

येथील जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात मंगळवारी (दि.२) दुपारी बाराच्या सुमारास जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर यांच्या अध्यक्षतेखाली व्यापा-यांसह उद्योजकांची बैठक आयोजित करण्यात आली होती. यातून कोरोनाचा वाढता प्रादूर्भाव व लॉकडाऊन संदर्भात गांभीयार्ने चर्चा करण्यात आली. जिल्हाधिकारी श्री.मुगळीकर यांनी कोरोनाचा वाढता प्रादूर्भाव रोखण्याकरिता काही उपाययोजना म्हणून कठोरपणे लॉकडाऊन करावे लागेल, असे नमूद केले. कोरोनाची साखळी तोडण्यासाठी ते गरजेचे आहे. त्यासाठी किमान ७ दिवसांचा लॉकडाऊन असावा, असा प्रशासनाव्दारे विचार सुरू असल्याचे नमूद केले.

या अनुषंगाने आपले मत काय, अशीही विचारणा केली. यावेळी बहुतांश व्यापा-यांनी अन्य जिल्ह्यांप्रमाणे पूर्णत: लॉकडाऊन करण्यास तीव्र विरोध दर्शवला. गेल्या वर्षभरापासून संपूर्ण व्यवहार पूर्णत: विस्कळीत झाले आहेत. छोटे-मोठे उद्योजक मोठ्या अडचणीत आहेत. व्यवहारात मंदी असून उलाढाल ढप्प असल्याचे सांगण्यात आले. गेल्या काही महिन्यांपासून कसेबसे व्यवहार सुरळीत होत आहेत. तोच पुन्हा लॉकडाऊन केल्यास पून्हा व्यवहार ठप्प होणार असल्याचे व्यापा-यांनी सांगितले. उद्योजकांनीही याच पध्दतीने या पध्दतीनेच सूर आळवला.

यावेळी जिल्हाधिकारी श्री.मुगळीकर यांनी काही उपाययोजना निश्र्चितच कराव्या लागतील. यातून मार्ग म्हणून दिवसाच्या ऐवजी रात्रीच्या संचारबंदीचा निर्णय घ्यावाच लागेल, असे स्पष्ट केले. यावेळी व्यापा-यांनी त्यास सहमती दर्शवली. रात्री सात ते सकाळी सात वेळेत संचारबंदी लागू करावयास हरकत नसल्याचे मत यावेळी व्यक्त करण्यात आले.

दरम्यान, जिल्हा प्रशासनाने सकाळी १० ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत व्यापा-यांनी आपापले व्यवहार करावेत. रात्री ७ पासून सकाळी ७ पर्यंत किमान सात दिवस संचारबंदी लागू करता येईल का याबाबत विचार करू, असे स्पष्ट केले. काही व्यापा-यांनी यातून जीवनावश्यक वस्तूंना पूर्णत: सूट द्यावी, अशी मागणी केली. यावर औषधी, भाजीपाला, किराणा, दूध व अन्य जीवनावश्यक वस्तुंना यातून निश्र्चितच वगळले जाईल असे प्रशासनाने म्हटले. बैठकीस सूर्यकांत हाके, नितीन वट्टमवार, सचिन अंबिलवादे, अशोक माटरा, संदीप भंडारी, प्रमोद वाकोडकर, ओमप्रकाश डागा, पवनकुमार झांजरी, रमेश पेकम, अशरफसेठ पाडेला यांच्यासह आदी उपस्थित होते.

थकबाकीबाबत निर्णय होईपर्यंत वीज कनेक्शन तोडणार नाही – उपमुख्यमंत्री अजित पवार

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,483FansLike
172FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या