25.5 C
Latur
Saturday, September 18, 2021
Homeपरभणीट्रक कारच्या अपघातात नऊ जखमी

ट्रक कारच्या अपघातात नऊ जखमी

एकमत ऑनलाईन

जिंतूर : शहरातील परभणी रोडवर असलेल्या ग्रीनपार्क समोर ट्रक व इंडिका कारचा समोरा समोर झालेल्या अपघातामध्ये नऊ जण जखमी झालेअसून यात तीन चिमुकल्यांचा समावेश आहे. या जखमींना तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरु आहे. जिंतूर येथे सकाळी १०.३० च्या सुमारास औरंगाबाद कडून नांदेडला जाणारी इंडिका कार (एमएच-२० ए.जी.६३४०) व औरंगाबादकजे जाणारा मालवाहतूक ट्रक (आरजे-१९ जीबी-७२१७) यांची ग्रीनपार्क समोर समोरा-समोर धडक झाली.या अपघातामध्ये इंडिकाचा चक्काचूर झाला तर आतील नऊ प्रवासी गंभीर जखमी झाले.

अपघात घडताच आजूबाजूच्या नागरीकांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेवून जखमींना रुग्णालयात हलविले.या अपघातामध्ये तिन चिमुकलेही जखमी झाले आहेत. इंडिका कारमधील तेजस रामराव राठोड (३०) रा.औरंगाबाद, अजित पवार (३०), कृष्णा पवार (२७), निकीता पवार (२२),अजीत पवार (२८), प्रतिक्षा राठोड (२५), सर्व राह.णार नांदेड, किर.ण राठोड (०७), कांचन राठोड (८), काजल राठोड (३) रा. औरंगाबाद हे जखमी झाले आहेत. यातील काही जणांना छातीवर, हाताला, डोक्याला, दुखापत झाली आहे.

जिंतूर-परभणी रस्ता मागील चार वषार्पासून संथगतीने सुरू आहे.रस्त्याचे काम सुरु असल्याने या रस्त्यावर अपघाताचे प्रमाण वाढले आहे. यात काहींचा बळीही गेला आहे. रस्त्याचे काम सुरु असल्याने या मार्गावर एकेरी वाहतूक सुरु आहे. त्यामुळे वाहने समोरा समोर येवून अपघात होत आहेत. शनिवारी घडलेला हा अपघातही वाहने रस्त्याखाली जात नसल्याने घडल्याची माहीती नागरिकांनी दिली.या रस्त्यावर वाहनाची गती कमी असल्याने मोठा अनर्थ टळला.दरम्यान, जिंतूर परभणी रस्ता तात्काळ करावा अशी मागणी आता जोर धरू लागली आहे.

461 वीज चोरांविरुध्द महावितरणची कारवाई

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,527FansLike
196FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या