27 C
Latur
Saturday, February 27, 2021
Home परभणी पोटाची खळगी भरण्यासाठी पैसे नाहीत : शिक्षणासाठी स्मार्ट फोन आणायचा कुठून

पोटाची खळगी भरण्यासाठी पैसे नाहीत : शिक्षणासाठी स्मार्ट फोन आणायचा कुठून

एकमत ऑनलाईन

परभणी : कोरोना संसर्ग वाढत असून दिवसेंदिवस रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. कोरोनाचा संसर्ग वाढू नये, म्हणून सर्वत्र लॉकडाऊन करण्यात आला आहे. परिणामी जून महिन्यात सुरू होणा-या शाळा अजूनही प्रत्यक्षात सुरू झालेल्या नाहीत. परंतू अनेक शाळांनी आॅनलाइन अभ्यासक्रम सुरू केला आहे. मात्र त्यासाठी आवश्यक असलेला स्मार्ट फोन, गरीब शेतकरी आणि शेत मजुरांच्या खिशाला परवडणारा नाही. परिणामी अनेकांची मुलं सध्या शिक्षण सोडून शेती कामात जुंपलेली दिसून येत आहेत.

खरीपाचा हंगाम सुरू असल्याने, परभणी जिल्ह्यात शेतीच्या कामाचा वेग वाढला आहे. मात्र या शेतांमध्ये शेतकºयांसोबत त्यांची मुलं देखील राबताना दिसून येत आहेत. कारण सध्या लॉकडाऊनमुळे प्रत्यक्ष शाळा सुरू झाल्या नसल्या तरी आॅनलाईन पद्धतीने शिक्षकांकडून शिकवणी घेतल्या जात आहे. मात्र त्यासाठी आवश्यक असलेला स्माटर्फोन उपलब्ध नसल्याने हे विद्यार्थी अभ्यास सोडून आई-वडिलांना शेतीच्या कामांमध्ये मदत करताना पाहायला मिळत आहेत. या संदर्भात परभणी तालुक्यातील नांदापूर आणि पेडगाव शिवारात शेतांवर जाऊन चौकशी केली.

अनेक शेतांमध्ये शेतक-यांची तसेच शेत मजूरांची मुलं देखील आपल्या आई-वडिलां सोबत शेतांमध्ये काम करताना आढळून आली.पेडगाव शिवारातील एका शेतात काम करणारा शेतमजूर रामभाऊ सपाटे यांना मुलांच्या शिक्षणाबाबत विचारले असता, त्यांनी स्मार्ट मोबाईल घेऊ शकत नसल्याची मजबूरी व्यक्त केली. ते म्हणाले, ह्यसाहेब कशाची शाळा आली, शिक्षक मुलांना मोठा मोबाईल घेऊन द्या, म्हणून सांगतात. पण त्याच्यासाठी पैसे कुठून आणायचे?

आमची मुलं एरवी शाळेत जात होती. मात्र आता कोरोनामुळे शाळा बंद झाली. आॅनलाइन शाळेसाठी मोबाईल नाही म्हणून आमची मुलं आमच्या सोबत शेतात कामाला येतात. आमच्या सोबतच काम करून पाच-पन्नास रुपये कमवतात. तेवढाच आमच्या घराला हातभार लागतो. लॉकडाऊनमध्ये सध्या आमच्या हाताला पण म्हणावं तसं काम नाही.

त्यामुळं काम मिळेलं, तिथं मुलांना ही सोबत घेवून जातोय.आॅनलाईन शिक्षणासाठी स्मार्ट फोन आणायचा कुठून?. या संदर्भात काही विद्यार्थ्यांनी देखील माहिती दिली. त्यांच्या म्हणण्याप्रमाणे ह्यशिक्षक मोबाईल घ्या म्हणून मागे लागत आहेत, पण आमचे वडिल गरीब आहेत. ते मोबाईल घेऊ शकत नसल्याने आमचा आॅनलाईन अभ्यास होत नाही. शाळेतून पुस्तके मिळाली. पण ती शिकायला मोबाईल पाहिजे. पण आई-वडिल मोबाईल घेऊन देत नाहीत, म्हणून आमचा अभ्यास सध्या होत नाही. त्यामुळे आम्ही वडिलांसोबत शेतात येऊन काम करतो. ५० ते १०० रुपये आम्हाला दिवसाकाठी मिळतात, ते आम्ही आमच्या आई वडिलांना देतोय.एकूणच काय तर.. लॉकडाऊनमुळे आॅनलाईन शिक्षण पद्धत सुरू झाली.

Read More  रस्त्यासाठी युवकाने घेतले विष

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,434FansLike
122FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या