24.7 C
Latur
Thursday, July 7, 2022
Homeपरभणीसंघ समजण्यासाठी निरीक्षण महत्वाचे : हरिष कुलकर्णी

संघ समजण्यासाठी निरीक्षण महत्वाचे : हरिष कुलकर्णी

एकमत ऑनलाईन

परभणी : राष्ट्रीय स्वयंसेवक संघ समजून घ्यायचा असेल तर आधी एक वर्ष संघात राहून निरीक्षण करा मग संघात रहायचे की नाही ते ठरवावे, असे मत राष्ट्रीय स्वयंसेवक संघ देवगिरी प्रांतचे हरिष कुलकर्णी यांनी परभणीत व्यक्त केले.
देवगिरी प्रांताच्या प्रथम वर्षाच्या संघशिक्षा वर्गाचा प्रकट समारोप शनिवारी (दि. २८) गंगाखेड रस्त्यावरील राजे संभाजी गुरुकुलाच्या विस्तीर्ण मैदानावर झाला. यावेळी प्रमुख वक्ते म्हणून कुलकर्णी बोलत होते.

प्रमुख पाहुणे म्हणून वसमत तालुक्यातील सातेफळ येथील सूर्या फार्मर्स प्रोड्युसर कंपनीचे प्रल्हाद बोरगड, शहर संघचालक डॉ. रामेश्वर नाईक, प्रांत संघचालक तथा वर्गाधिकारी अनिल भालेराव ऊपस्थित होते.

यावेळी हरीष कुलकर्णी यांनी संघ कार्याविषयी विस्तृत मार्गदर्शन केले. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ मागील ९७ वर्षांपासून हिंदुंना संघटित करण्याचे काम करीत आहे. या कार्यासाठी सक्षम कार्यकर्ते घडविण्याचे काम संघशिक्षा वर्गातून होत आले आहे. याचाच भाग म्हणून देवगिरी प्रांताचा प्रथम वर्ष संघशिक्षा वर्ग यावर्षी परभणीत पार पडला, असे ते म्हणाले.

या संघ शिक्षा वर्गासाठी सुमारे १५० स्वयंसेवकांनी हजेरी लावली होती. प्रास्ताविक वर्ग कार्यवाह अभिजित अष्टूरकर यांनी तर अभिजित बहिवाळ यांनी प्रात्यक्षिके करून घेतली. अतिशय शिस्तीत आणि खेळीमेळीच्या वातावरणात हा २१ दिवसीय संघशिक्षा वर्ग पार पडला. शनिवारी झालेल्या समारोपाच्या प्रसंगी मोठ्या संख्येने स्वयंसेवक व जिल्हावासीयांची ऊपस्थिती होती.

भोजन व्यवस्थेसाठी अनोखे पोळी संकलन
२१ दिवस चाललेल्या या संघ शिक्षा वर्गासाठी परभणी शहरासह जिल्हाभरातून मोठ्या प्रमाणात पोळी संकलन करण्यात आले. यातून स्वयंसेवकांची भोजन व्यवस्था करण्यात आली. यात ८ दिवस परिसरातील गावांमधून तर १२ दिवस शहरामधून पोळ््यांचे संकलन करण्यात आले.

Stay Connected

1,567FansLike
187FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या