34.4 C
Latur
Friday, March 5, 2021
Home परभणी संभाजी सेनेच्या वतीने आमदारांच्या घरासमोर ठिय्या व गोंधळ आंदोलन

संभाजी सेनेच्या वतीने आमदारांच्या घरासमोर ठिय्या व गोंधळ आंदोलन

एकमत ऑनलाईन

परभणी (प्रतिनिधी) :मराठवाड्यातील गुणवंत विद्यार्थ्यांना एमबीबीएस प्रवेशासाठी न्याय द्यावा .७०:३० चा फार्मूला रद्द करण्याच्या मागणीसाठी संभाजी सेनेचा आमदारांच्या घरासमोर गोंधळ वैद्यकीय प्रवेशासाठी चा ७०:३० फार्मूला रद्द करण्याच्या मागणीसाठी संभाजी सेनेच्या वतीने गेली अनेक वर्षापासून धरणे, मोर्चे , उपोषणे इत्यादी प्रकारे आंदोलन करण्यात येत आहे.आज जिल्हयातील सर्व आमदारांच्या घरासमोर आंदोलन करण्यात आले.

मराठवाड्यातील संपूर्ण जिल्ह्यामध्ये यापूर्वी वेळोवेळी मोर्चे काढले आहेत याच मागणीसाठी संभाजी सेनेच्या वतीने 16 मार्च 2020 रोजी आझाद मैदान मुंबई येथे धरणे आंदोलन करण्यात येणार होते कोरोनाच्या महामारी मुळे सदरील आंदोलन रद्द करण्यात आले होते परंतु १३ सप्टेंबर रोजी नीट ची परीक्षा होत असल्याने आणि ७ तारखेला सुरू होणा-या पावसाळी अधिवेशनाच्या सभागृहांमध्ये मराठवाड्यातील सर्व आमदारांनी हा विषय लावून धरावा आणि मराठवाड्यातील गुणवंत विद्यार्थ्यांना एमबीबीएस प्रवेशासाठी न्याय द्यावा.

७०:३० चा फार्मूला तात्काळ रद्द करावा या मागणीसाठी आमदारांच्या घरासमोर संभाजी सेनेच्या वतीने गोंधळ घालून आंदोलन करण्यात आले आज परभणी येथील आ.डॉ. राहुल पाटील, आ. मेघना बोर्डीकर,आ.डॉ.रत्नाकर गुट्टे आदींच्या घरासमोर संघटनेच्या वतीने गोंधळ आंदोलन करण्यात आले या आंदोलनामध्ये संभाजी सेनेचे प्रदेशाध्यक्ष रामेश्वर शिंदे जिल्हाध्यक्ष विठ्ठल तळेकर ग्रामीण जिल्हाध्यक्ष नारायण देशमुख ,मराठवाडा कार्याध्यक्ष गजानन लव्हाळे,शहराध्यक्ष अरुण पवार, जिल्हा संघटक विजय जाधव, जिल्हा उपाध्यक्ष सतीश जाधव, विद्यार्र्थी शहराध्यक्ष सोनू पवार, पवन कुरील, रवि तांबे ,माधव थीटे, डॉ. उद्धव देशमुख सह गोंधळी यांचा सहभाग होता.

महाराष्ट्रातील दोन शिक्षकांना राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार प्रदान

वैद्यकीय महाविद्यालय सुरू करण्यासाठी पाथरीत स्वाक्षरी मोहिम
परभणी येथे वैद्यकीय महाविद्यालय सुरू करावे व वैद्यकीय प्रवेशा साठी असणारे ७०:३० टक्केचा हा नियम रद्द करावा या मागणी साठी परभणीचे खासदार संजय ऊर्फ बंडू जाधव यांच्या नेतृत्वाखाली सर्व पक्षीय स्वाक्षरी मोहीम राबविण्यात येत असून आज पाथरी येथे याचा शुभारंभ सेलू कॉर्नर येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या नियोजन जागेवर पुष्पहार अर्पण करून करण्यात आला.

यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख सुरेश ढगे, भाजपा चे माजी जिल्हाध्यक्ष प्रा.पी.डी. पाटील शिवसेना उपजिल्हाप्रमुख रविंद्र धर्मे भाजपा उपजिल्हाअध्यक्ष डॉ. उमेश देशमुख तालुका अध्यक्ष प्रा.डॉ. शिवराज नाईक भाजपा नेते डॉ. राजेंद्र चौधरी शिवसेना शहर प्रमुख राहुल पाटील युवासेना उपजिल्हाधिकारी रामचंद्र आम्ले दीपक कुलकर्णी मधुकर नाईक भाजपा शहर अध्यक्ष संतोष जोगदंड उपतालुकप्रमुख बाळासाहेब आरबड युवासेना तालुका अधिकारी अविराज टाकळकर युवासेना शहर अधिकारी प्रमोद चाफेकर,सर्कल प्रमुख रावसाहेब निकम,राधे गिराम,विष्णु चव्हाण,परमेश्वर नवले हे उपस्थित होते.

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,440FansLike
122FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या