23.6 C
Latur
Tuesday, October 4, 2022
Homeपरभणीस्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त महिलांनी काढली तिरंगा रॅली

स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त महिलांनी काढली तिरंगा रॅली

एकमत ऑनलाईन

सोनपेठ : स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव समारंभानिमित्त शहरातून महिलांनी तिरंगा रॅली काढली. बंजारा महिलांनी पारंपारिक वेशभूषेत सादर केलेले बंजारा नृत्य उपस्थितांचे मनमोहुन गेले. तिरंगा रंगातील साड्या परिधान केलेल्या महिलांनी हातात राष्ट्रध्वज धरुन शहरातील मुख्य रस्त्यावरुन फेरी काढली.

भारतीय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव निमित्ताने सोनपेठ शहरात प्रशासन व विविध संस्थांच्या वतीने अनेक उपक्रम राबविण्यात येत आहेत. महिला आर्थिक विकास महामंडळ व सर्वोदय लोकसाधन केंद्र यांच्या वतीने दि. १० ऑगस्ट रोजी शहरातून महिलांची तिरंगा रॅली काढण्यात आली. या रॅलीची सुरुवात महिला आर्थिक विकास महामंडळाच्या लोकसाधन केंद्रापासून तहसीलदार सारंग चव्हाण यांच्या हस्ते झेंडा दाखवुन करण्यात आली. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून मुख्याधिकारी विठ्ठल केदारे, सहाय्यक पोलिस निरीक्षक संदीप बोरकर, सुधीर बिंदू, पोलिस उपनिरीक्षक विष्णु गिरी, मिरा बहेनजी, प्राचार्य शकीला शेख, सर्वोदयच्या अध्यक्षा निता धाकपाडे, व्यवस्थापक सय्यद नसीम आदी उपस्थित होते. या रॅलीपुर्वी बचत गटांच्या महिलांनी विविध सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या