परभणी : येथील शिवसेना खा.संजय जाधव यांना जिवे मारण्याचा कट रचल्या प़्रकऱणी खुद्द खा. जाधव यांनी तक्रार दिल्यांनतर पोलीसांची नांदेडमधून एका संशयीतात ताब्यात घेतले असल्याची माहीती मिळाली आहे.
शिवसेना खा. संजय जाधव यांना जिवे माऱण्याचा कट नांदेड येथे रचल्याची तक्रार नानलप्पेठ पोलीस ठाण्यात दोन दिवसापुर्वी दाखल करण्यात आली होती. यानंतर पोलीस अधिक्षक जयंत मिना यांनी अतिरीक्त पो.अ. सुदर्शन मुम्मका यांच्या मार्गदर्शनखाली चौकशी समिती स्थापन केली.
यात नानलपेठ पोलीस ठाण्याचे पो.नि. कुंदनकुमार वाघमारे, पो.निरीक्षक प्रविण मोरे यांचा समावशे आहे. या तक्रारीच्या अनुषंगाने चौकशी केली आहे. याच दरम्यान,जिवे मारण्याचा कटाबाबत नांदेड पोलीसांनी एका संशयीतास ताब्यात घेतल्याची माहीती मिळत आहे.
म्हसवड ते टेंभुर्णी रस्त्याचे काम पंधरा दिवसात सुरू करा