22.8 C
Latur
Saturday, October 1, 2022
Homeपरभणीविजेचा धक्क्याने एक ठार; आरोपीला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी

विजेचा धक्क्याने एक ठार; आरोपीला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी

एकमत ऑनलाईन

चारठाणा : येथून काही अंतरावर असलेल्या हलविरा येथे विद्युत तारा ओढताना विजेचा शॉक लागून जयानंद निकाळजे यांचा मृत्यू झाला होता. या प्रकरणी निकाळजे यांच्या पत्नीने दिलेल्या तक्रारीवरून एकनाथ इंगळे यांच्या विरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यांना अटक करण्यात आली आहे. या प्रकरणी इंगळे यांना न्यायालयात हजर केले असता १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे.

जिंतूर तालुक्यातील हलविरा परिसरात गुरुवार, दि. २५ ऑगस्ट रोजी विद्युत तारांची दुरुस्ती करण्यासाठी चारठाणा येथील एकनाथ इंगळे व जयानंद निकाळजे हे दोघेजण गेले होते. यावेळी एकनाथ इंगळे यांनी जयानंद यास विद्युत खांबावर पाठविण्यापुर्वी महावितरणकडून कोणतीही परवानगी घेतली नव्हती. केवळ विद्युत डी.पी. तील प्युज काढून विद्युत तारा ओढण्याचे काम करीत असताना तार तुटून मुख्य विद्युत वाहिनीच्या ताराला स्पर्श झाल्याने चारठाणा येथील जयानंद सखाराम निकाळजे (४२) हा तारेला चिटकून जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली होती.

दरम्यान या प्रकरणी मयाताची पत्नी प्रजावती जयानंद निकाळजे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून पतीच्या मृत्युस कारणीभूत ठरलेल्या एकनाथ इंगळे यांच्याविरुद्ध चारठाणा येथील पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहेÞ या प्रकरणाचा तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक बालाजी गायकवाड करीत आहे.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या