27.1 C
Latur
Wednesday, July 6, 2022
Homeपरभणीपरभणीत कु-हाडीने वार करून एकाचा खून

परभणीत कु-हाडीने वार करून एकाचा खून

एकमत ऑनलाईन

परभणी : शहरातील क्रांती नगरात शुक्रवार, दि.१७ रात्री उशिरा क्षुल्लक कारणातून वाद झाल्यानंतर या वादाचे रूपांतर भांडणात होवून यावेळी कु-हाडीने वार केल्याने एका व्यक्तीचा जागीच मृत्यू झाल्याची घटना येथे घडली.

शहरातील क्रांती नगर भागात शुक्रवारी रात्री शेख जावेद शेख युसूफ (वय ४५) हे घरगुती गॅसची टाकी मागण्याकरीता जावेद पठाण गफ्फार पठाण यांच्या घरी गेले होते. त्यावेळी माझ्या जवळ टाकी नाही, नंतर देतो. तुला एकदा सांगितलेले समजत नाही का? असे म्हणत जावेद पठाण गफ्फार पठाण याने वाद घातला. शिवीगाळ केली. या नंतर पठाण यांनी कु-हाडीने शेख जावेद यांच्या गळ्यावर, डोक्यावर वार केले. यात शेख जावेद यांचा जागीच मृत्यू झाला.

दरम्यान, या घटनेनंतर आरोपी जावेद पठाण गफ्फार पठाण हा तेथून पसार झाला आहे. घटनेची माहिती मिळताच कोतवाली पोलिसांनी तात्काळ धाव घेवून आरोपीस पकडण्याकरीता दोन पथके तैनात केली आहेत. त्या पथकाने शनिवारी दुपारपर्यंत आरोपीचा तपास घेण्यास सुरुवात केलेली आहे. सहाय्यक पोलिस निरीक्षक अविनाश कुमार, पोलिस निरीक्षक शरद जराड यांनी घटनास्थळी भेट दिली. या घटनेने परीसरात खळबळ उडाली आहे.

Stay Connected

1,567FansLike
187FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या