28 C
Latur
Friday, September 30, 2022
Homeपरभणीपरभणीतील आयकर कार्यालय तात्काळ सुरू करण्याचे आदेश

परभणीतील आयकर कार्यालय तात्काळ सुरू करण्याचे आदेश

एकमत ऑनलाईन

परभणी : परभणी येथून हिंगोलीस स्थलांतरीत करण्यात आलेले आयकर कार्यालय पुन्हा परभणी येथे तात्काळ सुरू करण्यात यावे असे आदेश पुणे येथील आयकर विभागाचे प्रिंसीपल चिफ कमिशनर प्रविण कुमार यांनी काढले आहेत़ विशेष म्हणजे मे महिन्यात केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ. भागवत कराड यांनी परभणीतून स्थलांतरीत करण्यात आलेले आयकर कार्यालय लवकरच परभणीत परत कार्यान्वित होईल असे आश्वासन दिले होते़ परभणीतील आयकर कार्यालय पुन्हा तात्काळ सुरू करण्याचे आदेश निघाल्याने डॉक़राड यांनी परभणीकरांना दिलेल्या आश्वसनाची पुर्तता केली असून याबद्दल परभणी कर सल्लागार संघटनेत समाधान व्यक्त होत आहे.

परभणी येथे १९६३ पासून सुरू असलेले आयकर कार्यालय बंद करून ते हिंगोली येथे स्थलांतरीत करण्यात आले होते़ विशेष म्हणजे परभणी येथे स्वत:च्या इमारतीत आयकर कार्यालय सुरू असताना हिंगोली येथे किरायच्या इमारतीत हे कार्यालय स्थलांतरीत करण्यात आले होते़ यामुळे परभणी जिल्ह्यातील करदाता, कर सल्लागार आणि चार्टर्ड अकाउटंट यांना हिंगोली येथे जावून या कार्यालयाशी संबंधीत कामकाज करण्यास अनेक अडचणी येत होत्या़
या पार्श्वभुमीवर केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ. भागवत कराड यांच्याकडे भाजपाचे प्रदेश कार्यकारिणी सदस्य संजय शेळके व कर सल्लागार संघटनेचे अध्यक्ष अ‍ॅड़राजकुमार भांबरे यांनी औरंगाबाद येथे दि़२१ मे २०२२ रोजी भेट घेवून हिंगोली येथे स्थलांतरीत झालेले आयकर कार्यालय पुन्हा परभणीत स्थापन करण्याची विनंती केली होती.

यावेळी डॉ. कराड यांनी परभणीतील आयकर कार्यालय पुन्हा सुरू करण्यासाठी प्रयत्न सुरू असून लवकरच हे कार्यालय पुन्हा सुरू करण्यात येईल असे आश्वासन दिले होते़ यावेळी झालेल्या चर्चेनुसार डॉक़राड यांनी परभणीतील आयकर कार्यालय पुन्हा परभणीत सुरू करण्यासाठी वरीष्ठ पातळीवर प्रयत्न सुरू केले होते. डॉ. कराड यांनी वरीष्ठ पातळीवर केलेल्या प्रयत्नामुळे परभणीतील आयकर कार्यालय पुन्हा परभणीत सुरू करण्यास मंजुरी मिळाली आहे. तसेच या संदर्भात पुणे येथील आयकर विभागाचे प्रिंसीपल चिफ कमिशनर प्रविण कुमार यांनी दि़०८ सप्टेंबर २०२२ रोजी परभणी येथील आयकर कार्यालय तात्काळ कार्यान्वित करण्याचे आदेश काढले आहेत.

त्यामुळे डॉ. क़राड यांनी आयकर सल्लागार संघटनेला दिलेला शब्द पाळला असून या बद्दल परभणी जिल्ह्यातील आयकर दात्यांसह, करसल्लागार व चार्टड अकाउंटट, व्यापारी यांना दिलासा मिळाला आहे़ याबद्दल केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ़ भागवत कराड यांचे कर सल्लागार संघटनेने आभार व्यक्त केले आहेत.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या