परभणी : उमेद – महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवन्नोत्ती अभियान अंतर्गत ग्रामीण भागातील स्वंय सहायता समूहातील महिलांच्या यशोगाथा दृकश्राव्य स्वरुपात लोकांपर्यंत पोहोचविण्याच्या हेतूने राज्यस्तरीय लघुपट व माहितीपट आणि चित्रफित निर्मिती स्पर्धेचे आयोजन १ ते ३0 जून २०२२ या कालावधीत करण्यात आले आहे.
सदर स्पर्धा सर्वांसाठी खुली असून, त्यात व्यावसायिक, हौशी चित्रपट निर्माते, व्हीडिओ निर्माते व यूट्यूब ब्लॉगर यांना सहभागी होता येईल.
राज्यस्तरावर निवड होणा-या स्पर्धकांसाठी प्रथम पारितोषिक ३ लक्ष रुपये व सन्मान चिन्ह, द्वितीय पारितोषिक २ लक्ष रुपये व सन्मान चिन्ह, तृतीय पारितोषिक १ लक्ष रुपये व सन्मान चिन्ह आणि उत्तेजनार्थ रुपये ५0 हजार व सन्मान चिन्ह व प्रमाणपत्र देऊन गौरव करण्यात येणार आहे.
चित्रफित जिल्हास्तरावर सादर करण्याचा शेवटचा दिनांक १५ जून २०२२ आहे. चित्रफितीचा कालावधी जास्तीत जास्त ७ मिनिटे आहे. स्पर्धेचे विषय, नियम, प्रवेश अर्ज व इतर माहितीसाठी अनिल भंडारे जिल्हा व्यवस्थापक यांच्यासह तालुक्यातील तालुका अभियान व्यवस्थापन कक्ष, पंचायत समिती येथे संपर्क करता येईल.
राज्यस्तरीय लघुपट व माहितीपट निर्मिती स्पर्धेत जास्तीत जास्त नागरिकांनी सहभाग नोंदविण्याचे आवाहन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी शिवानंद टाकसाळे, जिल्हा अभियान संचालक रश्मी खांडेकर, जिल्हा अभियान व्यवस्थापक दिपक दहे उमेद जिल्हा परिषद परभणी यांच्या वतीने करण्यात आले आहे.