24 C
Latur
Monday, September 26, 2022
Homeपरभणीकोरोनावर मात करून सहाजण घरी:रुग्ण झाले भावुक

कोरोनावर मात करून सहाजण घरी:रुग्ण झाले भावुक

एकमत ऑनलाईन

सोनपेठ : येथे उपचारासाठी दाखल असलेल्या सहाजणांनी कोवीडवर यशस्वी मात करुन आपल्या घरी परतले आहेत यावेळी परिविक्षाधीन तहसीलदार ऐश्वर्या गिरी यांनी सगळ्यांना शुभेच्छा दिल्या.

सोनपेठ येथील ग्रामीण रुग्णालयाच्या ईमारती मध्ये कोवीड सेंटर सुरु करण्यात आले आहे. आधी या ठिकाणी फक्त विलगीकरण कक्ष होता व संशयित रुग्णांना येथे विलगीकरणासाठी ठेवण्यात येत होते. कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होत असल्याने गंभीर लक्षणे नसलेल्या कोरोना बाधीत रुग्णांना या ठिकाणी ठेवण्यात येत होते . या ठिकाणी आता पर्यंत दहा कोरोना बाधीत रुग्णांना ठेवण्यात आले होते. यातील सहा रुग्णांवर यशस्वी उपचार झाल्यानंतर त्याची कोवीड चाचणी निगेटिव्ह झाल्यावर त्यांना रुग्णालयातुन दि.३० रोजी घरी सोडण्यात आले.

या वेळी तालुका प्रशासनाच्या वतीने परिविक्षाधीन तहसीलदार ऐश्वर्या गिरी यांनी सर्व रुग्णांना पुष्पगुच्छ देऊन शुभेच्छा दिल्या या वेळी रुग्णालय अधिक्षक डॉ सिध्देश्वर हालगे,तालुका आरोग्य अधिकारी डॉ सुभाष पवार,रवींद्र देशमुख,सुधीर बिंदू,सिध्देश्वर गिरी, डॉ सचिन कस्पटे,डॉ कपिल महाजन, मेनका लांडे ,मिनल भदाडे ,नेहा पवार ,साईनाथ पांचाळ गृृृहरक्षक दलाचे मस्के यांच्या सह रुग्णांचे नातेवाईक उपस्थित होते .कोरोनावर यशस्वी उपचार घेऊन बरे झालेले रुग्ण भावुक झाले होते.

उपचार व घेतलेल्या काळजीसाठी त्यांनी कोवीड सेंटरच्या सर्व डॉक्टर परिचारीका व सर्व कर्मचा-यांचे आभार व्यक्त करतांना त्यांच्या डोळ्यात पाणी आले होते. परिविक्षाधीन तहसीलदार ऐश्वर्या गिरी यांनी कोवीड सेंटर मधील विलगीकरण कक्षास भेट देऊन तेथे ठेवण्यात आलेल्या नागरिकांची चौकशी केली व त्यांना योग्य त्या सोईसुविधा पुरवण्यासाठी योग्य त्या सुचना दिल्या.

सेल्फी घेण्याच्या नादात मासेमारीसाठी गेलेल्या 2 मुलांना आईसमोरच जलसमाधी

 

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या