26.9 C
Latur
Monday, June 14, 2021
Homeपरभणीपरभणीतील ऑक्सीजन प्लँट कार्यान्वित

परभणीतील ऑक्सीजन प्लँट कार्यान्वित

एकमत ऑनलाईन

परभणी : येथील जिल्हा परिषदेच्या नूतन ईमारतीत उभारण्यात आलेल्या ऑक्सीजन प्लँटचे अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर शुक्रवार दि.१४ रोजी जिल्हाधिकारी दिपक मुगळीकर यांच्याहस्ते उद्घाटन करण्यात आले. जिल्हा परिषदेच्या नूतन ईमारतीच्या कोविड सेंटर परीसरात उभारण्यात आलेल्या ऑक्सीजन प्लँटच्या उद्घाटन प्रसंगी उपविभागीय अधिकारी संजय कुंडेटकर, तहसील संजय बिरादार, कैलास देशमुख यांच्यासह अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

जिल्ह्यात ऑक्सीजन कमतरता उद्भवत असल्याच्या पार्श्वभुमीवर परळी येथील थर्मलमधून ऑक्सीजन प्लँटचे साहित्य आणून जिल्हा परिषदेच्या नूतन ईमारत परिसरात हा ऑक्सीजन प्लँट उभारण्यात आला आहे. या ऑक्सीजन प्लँटच्या उभारणीसाठी विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर, जिल्हाधिकारी दिपक मुगळीकर यांच्यासह लोकप्रतिनिधींनी पुढाकार घेतला होता. जिल्हा परिषद नूतन ईमारत उभारण्यात आलेला हा ऑक्सीजन प्लँट शुक्रवारपासून कार्यान्वित झाला असल्याने ऑक्सीजन समस्येवर कायम स्वरूपी मार्ग निघाला आहे. याबद्दल नागरिकातून समाधान व्यक्त करण्यात येत आहे.

चितेवरील प्रेत उठून बसले, ओम ओम बोलू लागल

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,527FansLike
201FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या