30.3 C
Latur
Monday, May 10, 2021
Homeपरभणीपरभणी : येलदरी धरणाचे १० दरवाजे उघडले

परभणी : येलदरी धरणाचे १० दरवाजे उघडले

एकमत ऑनलाईन

परभणी : पुर्णा पाटबंधारे प्रकल्पाच्या येलदरी जलाशयातील पाण्याची अवाक मोठ्या प्रमाणे वाढली असून धरण शंभर टक्के भरले आहे. यापूर्वी दोन दरवाजातून पाण्याचा विसर्ग केला जात होता मात्र पाण्याची आवक पाहता रविवारी रात्री एक वाजून पंधरा मिनिटांनी सर्व दरवाजे उचलून १६८०० क्युसेसने पाण्याचा विसर्ग सुरू केला आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणात नदीपात्रात पाणी सोडण्यात आल्यानं पूरपरिस्थिती निर्माण झाली आहे.

येलदरी धरणातून गेल्या २ दिवसांपूर्वी २ दरवाजे , शनिवारी आणखीन २ दरवाजे उचलून पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला होता, रविवारी रात्री धरणाचे गेट क्रमांक १,३,५,६,८ व १० असे ६ दरवाजे अर्धा मीटर ने उचलण्यात आल्याने नदीपात्रात १६८००.०० क्यूसेक एवढा विसर्ग होत आहे. त्यामुळे पुर्णा नदीस पूर आला. दरम्यान नदीकाठच्या गावातील नागरिकांनी सावध राहावे असे आवाहन प्रशासनाच्या वतीने केले आहे.

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,494FansLike
184FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या