26.4 C
Latur
Wednesday, October 5, 2022
Homeपरभणीपरभणी : अवघ्या तीन दिवसात कोरोनाबाधित रुग्णाला डिस्चार्ज

परभणी : अवघ्या तीन दिवसात कोरोनाबाधित रुग्णाला डिस्चार्ज

एकमत ऑनलाईन

परभणी जिल्हा शासकीय रुग्णालयातील खळबळजनक प्रकार

परभणी : येथील जिल्हा शासकीय रुग्णालयातून पुर्णेतील एका कोरोनबाधित रुग्णालाच अवधानाने बुधवारी दुपारी डिस्चार्ज दिल्याचा खळबळजनक प्रकार उघडकीस आला आहे.

पूर्णेतील एक महिला १८ जुलै रोजी जिल्हा शासकीय रुग्णालयात अ­ॅडमीट झाली. वैद्यकीय अधिका-यांनी त्या महिलेचा स्वॅब तपासला असता तो पॉझिटीव्ह निघाला. त्यामुळेच त्या महिलेवर उपचार सुरू झाले होते.असे असतांना रुग्णालय प्रशासनाने त्या महिलेस बुधवारी दुपारी अचानक डिस्चार्ज दिला. त्यामुळे कुटुंबियांनी त्या महिलेस वाहनाद्वारे पूर्णेस घरी नेले. विशेष म्हणजे त्या परिसरातील उत्साही नागरिकांनी त्या महिलेच्या गाठीभेटी सुरू केले काहीनी स्वागत केले.

हे सत्र सुरू असतांना जागरूक नागरिकांना पॉझिटीव्ह असणा-या महिलेस तीन दिवसांत डिस्चार्ज मिळाल्याबद्दल आश्­चर्य व्यक्त केले. तेव्हा एकूण गोंधळ निदर्शनास आला. दरम्यान, त्याच कक्षात आडनावात साम्य असणारी गंगाखेडातील एक महिला उपचार घेत होती. त्या महिलेचा स्वॅब निगेटीव्ह आला. त्या महिलेस डिस्चार्ज देण्या ऐवजी पूर्णेतील या महिलेस डिस्चार्ज दिला गेला असावा, अशी माहिती हाती आली आहे.

जिल्हाधिका-यांद्वारे चौकशीचे आदेश

जिल्हा शासकीय रुग्णालयातून पुर्णेतील कोरोनाबाधित रुग्णालाच बुधवारी दुपारी डिस्चार्ज दिल्याचा खळबळजनक प्रकाराच्या पाश्र्­वभूमीवर जिल्हाधिकारी दिपक मुगळीकर यांनी बुधवारी रात्री त्या बाबीची गंभीर दखल घेवून चौकशीचे आदेश बजावले आहेत. जिल्हाधिकारी मुगळीकर यांच्याशी संपर्क साधला असता ही बाब अत्यंत गंभीर आहे. या गोष्टीची निश्­चीतच चौकशी झाली पाहिजे, असे नमुद केले.

याप्रकरणाबाबत माहिती अशी कि, पूर्णेतील एक महिला 18 जुलै रोजी जिल्हा शासकीय रुग्णालयात अ­ॅडमीट झाली. वैद्यकीय अधिका-यांनी त्या महिलेचा स्वॅब तपासला असता तो पॉझिटीव्ह निघाला. त्यामुळेच त्या महिलेवर उपचार सुरू झाले होते.असे असतांना रुग्णालय प्रशासनाने त्या महिलेस बुधवारी दुपारी अचानक डिस्चार्ज दिला. त्यामुळे कुटुंबियांनी त्या महिलेस वाहनाद्वारे पूर्णेस घरी नेले. विशेष म्हणजे त्या परिसरातील उत्साही नागरिकांनी त्या महिलेच्या गाठीभेटी सुरू केले काहीनी स्वागत केले. हे सत्र सुरू असतांना जागरूक नागरिकांना पॉझिटीव्ह असणा-या महिलेस तीन दिवसांत डिस्चार्ज मिळाल्याबद्दल आश्­चर्य व्यक्त केले. तेव्हा एकूण गोंधळ निदर्शनास आला.

दरम्यान, त्याच कक्षात आडनावात साम्य असणारी गंगाखेडातील एक महिला उपचार घेत होती. त्या महिलेचा स्वॅब निगेटीव्ह आला. त्या महिलेस डिस्चार्ज देण्या ऐवजी पूर्णेतील या महिलेस डिस्चार्ज दिला गेला असावा, अशी माहिती हाती आली आहे.

Read More  पहिली ते बारावीच्या विद्यार्थ्यांना ऑनलाईन शिक्षणाचे धडे

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या