परभणी : मार्च मध्ये घेण्यात आलेल्या इयत्ता दहावी परीक्षेचा निकाल आज जाहीर झाला आहे परभणी जिल्ह्याचा एकूण निकाल 95 पॉईंट 37 टक्के एवढा लागला असून यात मुलांपेक्षा मुलींनीच परत एकदा बाजी मारल्याचे दिसून आले परभणी जिल्ह्यात जिंतूर तालुक्याचा सर्वाधिक 97. 27% निकाल लागला.
परभणी जिल्ह्यात 9 तालुक्यात इयत्ता दहावीची मार्च महिन्यात परीक्षा घेण्यात आली होती या परीक्षांचा निकाल शुक्रवार दिनांक 17 जून रोजी घोषित करण्यात आला आहे. परभणी जिल्ह्यात एकूण 27 हजार 953 विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली होती यात 26 हजार 659 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत गुणवत्ता यादीत 12061 विद्यार्थी प्रथम श्रेणीत नऊ हजार 638 विद्यार्थी द्वितीय श्रेणीत 4208 विद्यार्थी तर 752 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत.
या निकालामध्ये सर्वाधिक जिंतूर तालुक्याचा 97 पॉईंट 27 टक्के तर परभणी 96.2, पूर्ण 95.63, गंगाखेड 94.96, पालम 92.57, सोनपेठ 96.77, पाथरी 96.44, मानवत 92.91, सेलु 92.27 % निकाल घोषित करण्यात आला आहे