29.2 C
Latur
Friday, May 7, 2021
Homeपरभणीपरभणी जिल्ह्यात कायमस्वरूपी लॉकडाऊन बंद करावे

परभणी जिल्ह्यात कायमस्वरूपी लॉकडाऊन बंद करावे

एकमत ऑनलाईन

परभणी : जिल्ह्यात सातत्याने करण्यात येत असलेले लॉकडाऊन कायमस्वरूपी रद्द करावे, भीमजयंती, रमजान ईद, व त्यानंतर येणा-या सर्व धार्मिक सण, जयंत्या, विवाहसोहळे यांना संपूर्ण सुट देऊन लोकसंख्येची अट रद्द करावी, यासह विविध मागण्यांसाठी लॉकडाऊन जनआंदोलनच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज पुतळा परिसरात निदर्शने करीत जिल्हा प्रशासनास निवेदन देण्यात आले.

जिल्ह्यात यापुढे लॉकडाऊन लावू नये, जिल्ह्यात लॉकडाऊनची आवश्यकताच नाही, असे कोविड काळात लॉकडाऊन मोडल्याच्या कारणामुळे व्यापारी व दुकानदार आणि कार्यकर्ते यांच्याविरूध्द दाखल केलेले गुन्हे मागे घ्यावेत, कोरोना निर्मूलनासाठी होत असलेल्या संपूर्ण निधीचे परिक्षण करण्यात यावे, आदी मागण्यांचा निवेदनात समावेश करण्यात आला तहसीलादर डॉ. संजय बिरादार यांना निवेदन देण्यात आले. यावेळी मोठा पोलिस बंदोबस्त तैणात करण्यात आला.

लॉकडाऊन विरोधी जनआंदोलनाचे संयोजक अब्दूल सलाम, सहसंयोजक कॉ. गणपत भिसे, बशीर अहेमद, विनय पाथरी, अ‍ॅड. पटेल, रफीक शेख, रफीक इनामदार, मुफ्ती सईद, नितीन सावंत, जावेद अन्सारी यांच्यासह कार्यकर्त्यांनी शुक्रवारी छत्रपती शिवाजी महाराज पुतळा परिसरात निदर्शने केली.

दरम्यान आंदोलनकर्त्यांना नवामोंढा पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक रामेश्वत तट, सहाय्यक पोलिस निरीक्षक आनंद बनसोडे, फौजदार रमेश गायकवाड, फौजदार अजय पाटील आदींनी ताब्यात घेतले.

ट्रक अपघातात गोशाळेतील ७ गायी चिरडल्या

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,493FansLike
183FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या