32 C
Latur
Friday, April 23, 2021
Homeपरभणीव्यापाऱ्यांच्या बंदला परभणीत प्रतिसाद

व्यापाऱ्यांच्या बंदला परभणीत प्रतिसाद

एकमत ऑनलाईन

परभणी : व्यापारी महासंघाने जीएसटीच्या निषेधार्थ पुकारलेल्या बंदला परभणीतील व्यापा-यांनी कडकडीत बंद ठेवत प्रतिसाद दिला. जीएसटी कायद्यात सुमारे 42 महिन्यात जवळपास एक हजारावर सुधारणा झाल्यामुळे व्यावसायिक आणि सीए व कर सल्लागार वैतागले आहेत. व्यापारी कर भरावयाला तयार आहेत, पण या सारख्या सुधारणा आणि नोटीसांना ते अक्षरश: कंटाळले आहेत. व्यापा-यांनी जर कर भरला नसता तर हे जीएसटीचे विक्रमी उत्पादन झालेच नसते. कराचे अनेक आणि विविध दर रिटर्न भरतांना त्रासदायक ठरत आहेत. आम्हाला जीएसटी, गुड अ‍ॅण्ड सिम्पल टॅक्स हवा होता, पण हा तर फारच गुंतागुंंतींचा झाला आहे.

तारखांच्या घोळामुळे व्यापारी आणि कर सल्लागार यांना सणवार सुट्टीपण राहीली नाही. सरकारी अधिकारी मात्र पाच दिवसांचा आठवडा आणि सार्वजनिक सुट्ट्या हक्काच्या रजा मिळवून वर्षात चार महिने सुट्ट्या घेवू लागले आहेत. कल्याणकारी राज्य कल्पनेत 100 गुन्हेगार सुटले तरी चालतील, पण एकाही निरापराधाला शिक्षा होता कामा नये, हे भारतीय घटनेला मान्य आहे. पण, सरकारला मात्र 100 प्रामाणिक करदात्याला शिक्षा झाली तरी चालेल, पण एकही कर बुडता, सुटता कामानये हे धोरण राबवायचे आहे. त्यामुळेच सरकारी अधिकारी प्रामाणिक करदात्याच्याच मागे लागले आहेत, असेही व्यापारी महासंघाने म्हटले.

प्रामाणिक करदाता कोणताही मोबदला न घेता कर गोळा करतो आहे. पण तोच सर्वात जास्त आज भरडल्या जात आहे. उदाहरणार्थ एकदा जीएसटी भरुन सरकारमान्य डीलरने तो सरकारी तिजोरीत भरला नाही तरी, शिक्षा जीएसटी भरलेल्यांनाच दिली जात आहे. अनेकवेळा इंटरनेट चालू नाही, त्यामुळे बँकेत भरणा करता येत नाही. जीएसटी साईट बंद असते, त्यामुळे रिटर्न अपलोड करता येत नाहीत, पण हे विचारात न घेता प्रामाणिक करदाता शिक्षा आणि दंडास पात्र ठरत असल्याबद्दल व्यापारी महासंघाने निवेदनाद्वारे तीव्र खंत व्यक्त केली.

मानवतमध्ये व्यापारपेठ बंद
केंद्र सरकारने लागू केलेल्या जी.एस.टी. धोरणाच्या विरोधात शुक्रवारी मानवत तालूका व्यापारी महासंघाने कडकडीत बंद पाळून या कायद्याचा निषेध केला. देशव्यापी बंदमध्ये येथील व्यापा-यांनी उस्फुर्त सहभाग घेतला. शहरातील सर्वच व्यापारी बांधवानी सकाळपासूनच दुकाने बंद ठेऊन सहभाग घेतला असल्याची माहिती मानवत व्यापारी महासंघाचे मानवत तालूकाध्यक्ष ज्ञानेश्‍वर मोरे पाटील यांनी दिली.

मांडवी परिसरात मटका जुगार जोमात; पोलिसांचे दुर्लक्ष

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,483FansLike
172FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या