परभणी : शेतीमध्ये ड्रोनचा वापर करण्याबाबत शेतक-यांमध्ये मोठी उत्सुकता आहे. ड्रोन वापराबाबतच्या प्रशिक्षणाचे परभणीत मोठे केंद्र बनणार असुन हे नवे तंत्र वापरणारे परभणी विद्यापीठ देशातील एकमेव असल्याचे प्रतिपादन कुलगुरू डॉ़ इंद्र मणि यांनी केले.
विद्यापीठात आयोजीत करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते़ यावेळी शेतीक्षेत्रात ड्रोन वापराबाबत राष्ट्रीय पातळीवर मानक कार्य पध्दती निश्चित करण्यात आलेल्या उच्चस्तरीय समितीच्या अध्यक्षपदाची जबाबदारी आपल्यावर आलेली आहे़ शेती क्षेत्रात ड्रोनचा वापर करून किटकनाशकांच्या फवारणीसाठी निश्चित लाभदायक ठरणार आहे़ तण व्यवस्थापन, पाणी व्यवस्थापन, कीड व रोग व्यवस्थापन, अन्नद्रव्य व्यवस्थापन आणि पिक विमा करिता ड्रोनचा वापर मोठ्या प्रमाणात होणार आहे.
आगामी काळात शेतीक्षेत्रात ड्रोन वापराबाबतचे प्रशिक्षण देणारे परभणी हे मोठे केंद्र बनेल असा विश्वास व्यक्त करून ड्रोन प्रयोग सादरीकरणासाठी पाच एकरावर शेती विकसित करण्यात येणार असल्याचे ते म्हणाले़